‘या’ शहरात कोविड-१९च्या मृतांना खड्ड्यात फेकलं गेलं, धक्कादायक व्हिडिओ समोर

कोविड-१९च्या रुग्णांच्या संख्येत देशात दिवसेंदिवस वाढ होतेय. त्यातच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. कोरोनामुळे जीव गेलेल्या ८ लोकांचे मृतदेह अमानुषपणे गाडल्या गेले. पाहा व्हिडिओ...

Ballari Covid-19 Patient Video
धक्कादायक! ‘या’ शहरात कोविड-१९च्या मृतांना खड्ड्यात फेकलं 

थोडं पण कामाचं

  • कोरोना संक्रमित ८ रुग्णांचे मृतदेह एका खड्ड्यात अमानुषपणे फेकले
  • सोशल मीडियावर मृतदेहांसोबत अमानुष व्यवहार करणारा हा व्हिडिओ व्हायरल
  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं दिले कारवाईचे आदेश

बेल्लारी: कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथल्या बल्लारीतील (ballari) हा व्हिडिओ आहे, जो पाहून आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओमध्ये (Video) पण बघू शकतो की, एका मोठ्या खड्ड्यामध्ये कोरोना संक्रमित (Corona Positive) मृत पावलेल्या रुग्णांचे मृतदेह फेकले जात आहेत. जिल्ह्यातील ८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्या सर्व मृतदेहांना (Dead Body) या मोठ्या खड्ड्यात अशापद्धतीनं फेकलं गेलं की, जसा कुणी कचरा फेकतंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले गेले आहेत. यात सहभागी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पण या व्हिडिओवरून ट्विट केलं आणि लिहिलं, ‘हा त्रास देणारा व्हिडिओ आहे. कोविड रुग्णांचे मृतदेह बल्लारी इथं एका खड्ड्यात अमानुष पद्धतीनं फेकले जात आहेत. हीच माणुसकी आहे का? कर्नाटक सरकार कशाप्रकारे कोरोनाचं संकट सांभाळत आहे, हा व्हिडिओ त्याचं प्रतिबिंब दर्शवतो. मी सरकारकडे याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी करतो आणि अशी घटना पुन्हा घडणार नाही, याची शाश्वती देण्याची मागणी करतोय.’

याप्रकरणी बल्लारीचे डेप्युटी कमिश्नर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, ‘दफन विधी दाखवणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बल्लारीच्या अॅडिशनल डेप्युटी कमिश्नर यांना याप्रकरणी तपासाचे आदेश दिले गेले आहेत आणि हा व्हिडिओ बल्लारीचा असल्याचं स्पष्ट झालंय. ८ लोकांना इथं गाडल्या गेलं, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. व्हिडिओतून हे स्पष्टपणे दिसतंय की, दफन करण्यासाठीच्या प्रोटोकॉलचं पालन केलं गेलंय. मात्र ज्यापद्धतीनं मृत रुग्णांचे मृतदेह टाकल्या गेले, त्यामुळे जिल्हा प्रशासन खूप खेद व्यक्त करत आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी