VIDEO: चोराने PPE किट घालून 13 कोटींचे दागिने केले लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद

13 Crore ornaments steals burglar wearing PPE kit: पीपीई किट घालून एका चोराने ज्वेलर्समधून तब्बल १३ कोटी रुपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना ज्वेलर्समधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Burglar steals rs 13 crore jewellery wearing ppe kit in delhi incident caught in cctv
VIDEO: PPE किट घालून 13 कोटींचे दागिने लंपास, घटना सीसीटीव्हीत कैद  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : दिल्लीतील कालकाजी (Kalkaji) येथील अंजली ज्वेलर्समध्ये पीपीई किट (Personal protective equipment, PPE kit) परिधान करुन शिरलेल्या चोराने तब्बल १३ कोटी रुपयांचे दागिने लंपास (ornaments worth Rs 13 cr. steal) केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव मोहम्मद शेख नूर असे आहे. पोलिसांनी आरोपीकडून १३ कोटी रुपयांचे २५ किलोंचे दागिने जप्त केले आहेत.

दक्षिण-पूर्व दिल्लीतील कालकाजी येथील अंजली ज्वेलर्सच्या शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास एक चोर पीपीई किट घालून शिरला. त्यानंतर चोराने २५ किलो सोन्याचे दागिने घेऊन फरार झाला. या दागिन्यांची किंमत १३ कोटी रुपये इतकी होती. दागिन्यांच्या शोरूम जवळील एका इमारतीत चोर शिरला आणि त्यानंतर छतावरुन शोरूमच्या इमारतीत शिरल्याची माहिती समोर आली आहे. 

या ठिकाणी चोर पाच ते सहा तास उपस्थित होते मात्र, असे असतानाही इमारतीच्या आसपास असलेल्या सुरक्षारक्षकांना याची जरासुद्धा कल्पना आली नाही. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आणि त्याला अटक करण्यात आली.

आरोपी मोहम्मद शेख नूर हा पश्चिम बंगालमधील बुहली जिल्ह्यातील निवासी आहे. तो कालकाजी येथेच इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता आणि तो सध्या सुट्टीवर होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी