पाकिस्तानच्या सैन्याने आणि आयएसआयने भारतात पाठवले, बाबरची कबुली

Pakistani terrorist Ali Babar पाकिस्तानच्या सैन्याने आणि आयएसआयने भारतात घातपात करण्यासाठी पाठवले, अशी कबुली दहशतवादी बाबर याने दिली.

Captured Pak terrorist Ali Babar sensational revelations on camera
पाकिस्तानच्या सैन्याने आणि आयएसआयने भारतात पाठवले, बाबरची कबुली 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानच्या सैन्याने आणि आयएसआयने भारतात पाठवले, बाबरची कबुली
  • भारतात हिंसेचे थैमान घालण्यासाठी प्रशिक्षित करून या दहशतवाद्याला पाकिस्तानने पाठवले
  • बाबरला सहा आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले

नवी दिल्ली: Pakistani terrorist Ali Babar पाकिस्तानच्या सैन्याने आणि आयएसआयने भारतात घातपात करण्यासाठी पाठवले, अशी कबुली दहशतवादी बाबर याने दिली. या कबुलीचा व्हिडीओ दहशतवादाला पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याच्या भारताच्या आरोपावर शिक्कामोर्तब करत आहे. Captured Pak terrorist Ali Babar sensational revelations on camera

पाकिस्तान वारंवार भारतात घातपात करण्यासाठी दहशतवादी पाठवतो. या दहशतवाद्यांना पैसे, शस्त्र, प्रशिक्षण तसेच इतर आवश्यक ती मदत पाकिस्तान देत आहे. हा भारताचा आरोप दहशतवादी बाबर याच्या कबुलीने पुन्हा एकदा सिद्ध झाला. भारतात हिंसेचे थैमान घालण्यासाठी प्रशिक्षित करून या दहशतवाद्याला पाकिस्तानने पाठवले होते.

आयएसआयच्या लोकांनी भारताविषयी आणि भारतीय सैन्याविषयी दिशाभूल करणारी माहिती दिली. ब्रेनवॉश केले आणि बाबर या दहशतवाद्याला भारतात पाठवले. भारतात हिंसक कारवाया करण्यासाठी बाबरला आयएसआयने ५० हजार रुपये देणार असल्याचे सांगितले. यापैकी २० हजार रुपये त्याला भारतात दाखल होण्यासाठी तयार होताच देण्यात आले.

बाबरला सहा आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने आणि आयएसआयने दहशतवादी बाबरला भारतात पाठवण्यासाठी एका लाँचिंग पॅडवर नेले. तिथूनच बाबरने भारतात घुसखोरी केली.

भारतीय सैन्य काश्मीरमध्ये सामान्यांना छळत असल्याची दिशाभूल करणारी माहिती आयएसआयने दिली, असे बाबरने कॅमेऱ्यासमोर बोलताना सांगितले. भारतात घुसखोरी करुन घातपात करण्यासाठी पाकिस्तानकडून पैशांची लालूच दाखवण्यात आल्याचे बाबर कॅमेऱ्यासमोर बोलला.

काही दिवसांपूर्वी सहा जण उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करत असल्याचे सुरक्षा पथकाच्या लक्षात आले. जवान सावध झाल्यामुळे घुसखोरी करण्याऐवजी चार जण माघारी गेले. पण जे दोघे भारतात दाखल झाले त्यांची आणि भारताच्या जवानांची चकमक झाली. चकमतीत एक दहशतवादी ठार झाला पण एका दहशतवाद्याने शस्त्र टाकून रडायला सुरुवात केली. मला मारू नका, मला जगायचे आहे; असे हा दहशतवादी बोलू लागला. जवानांनी या दहशतवाद्याला अटक करुन त्याचे नाव विचारले. दहशतवाद्याने त्याचे नाव अली बाबर असल्याचे सांगितले.

जवानांनी दहशतवादी बाबर याची कसून चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या जास्तीत जास्त हालचालींची माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे. 

पाकिस्तानमध्ये गरीब, अशिक्षित, कमी शिकलेल्या बेरोजगार तरुणांना तसेच धर्मांध विचारांनी प्रेरित असलेल्यांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाते. कधी धार्मिक विचार वारंवार सांगून तर कधी दिशाभूल करणारी माहिती देऊन ब्रेशनवॉश केले जाते. काही वेळा पैशांची लालूच दाखवली जाते तर काही वेळा धर्मकार्य करण्याची सुवर्णसंधी असे सांगून दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित केले जाते.

संरक्षण तज्ज्ञ जी डी बक्शी यांनी बाबरची कबुली बघितली आणि ऐकली. यानंतर त्यांनी 'टाइम्स नाउ नवभारत'ला प्रतिक्रिया दिली. बक्शी म्हणाले, अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून पाकिस्तान काश्मीरमध्ये घातपात करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानच्या हालचालींवर भारताचे लक्ष आहे. सावध असलेले भारतीय जवान दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सक्षम आहेत. अफगाणिस्तानमधील विजयाचा आनंद काश्मीरमध्ये साजरा करू, हा दहशतवादी विचार आहे. पण हा विचार करणाऱ्यांना हे माहिती नाही की काश्मीरमध्ये मृत्यू त्यांची वाट बघत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी