तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते अनुब्रत मंडल अटकेत, प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची कारवाई

Cattle smuggling case : प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते अनुब्रत मंडल यांना अटक केली आहे

CBI arrests TMC Birbhum district president Anubrata Mondal in Bolpur in Cattle smuggling case
तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते अनुब्रत मंडल अटकेत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते अनुब्रत मंडल अटकेत
  • प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयची कारवाई
  • पार्थ चटर्जी पाठोपाठ ममता बॅनर्जींना आणखी एका धक्का; अनुब्रत मंडल अटकेत

Cattle smuggling case : प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी सीबीआयने तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते अनुब्रत मंडल यांना अटक केली आहे. सीबीआयने प्राण्यांच्या तस्करीप्रकरणी आधी अनुब्रत मंडल यांना बुधवार १० ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण अनुब्रत मंडल चौकशीला गैरहजर राहिले. अखेर सीबीआयने अनुब्रत मंडल यांना अटक केली. 

अनुब्रत मंडल हे तृणमूल काँग्रेस पक्षाचे बीरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अटक होणे हा तृणमूल काँग्रेससाठी एक मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. याआधी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री पार्थ चटर्जी यांना ईडीने अटक केली. 

पार्थ चटर्जी यांच्या पाठोपाठ अनुब्रत मंडल यांनाही अटक झाली. अनुब्रत यांच्याकडे ४९ संपत्ती आहेत. या मालत्तेची चौकशी सुरू आहे. अनुब्रत मंत्री नसले तरी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू आहेत. यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक धक्का असल्याची चर्चा आहे. 

निमलष्करी जवानांच्या बंदोबस्तात कारवाई

सीबीआयची टीम निमलष्करी जवानांच्या कडेकोट बंदोबस्तात बीरभूममध्ये अनुब्रत मंडल यांच्या घरी आली. यानंतर सीबीआयने अनुब्रत मंडल यांना अटक केली. 

दहा वेळा बजावले होते समन्स

गायींच्या तस्करीच्या प्रकरणात अनुब्रत मंडल यांना आतापर्यंत दहा समन्स बजाववण्यात आली. यातील दहाव्या समन्स नंतरही अनुब्रत मंडल चौकशीसाठी येत नसल्याचे पाहून सीबीआयने अटकेची कारवाई केली.

Income Tax Alert : इन्कम टॅक्स रिफंडचा केला असेल दावा तर ठेवा हा पुरावा, येतायेत प्राप्तिकर विभागाच्या नोटिस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी