[VIDEO]: मोदी सरकारची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पासाठी २५,००० कोटी रुपये मंजूर 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 06, 2019 | 22:13 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Union Finance Minister: दिल्लीत केंद्रीय कॅबिनेटची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी २५ हजार कोटी केंद्र सरकार देणार आहे.

central government announce 25000 crore real estate sector lic sbi finance minister nirmala sitharaman business news marathi
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मोदी सरकारचा मोठा निर्णय
  • गृहनिर्माण क्षेत्राला २५ हजार कोटी रुपयांचा निधी
  • रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यास होणार मोठी मदत

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत गृहनिर्माण योजनेसाठी केंद्र सरकारने २५ हजार कोटी रुपये देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, देशभरातील गृहनिर्माण योजनेला लागलेली मरगळ काढण्यासाठी सरकारतर्फे आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही आर्थिक मदत सरकार, एसबीआय आणि एलआयसीकडून घेण्यात येणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे म्हटलं की, गृहनिर्माण क्षेत्राला २५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत आहोत. यामुळे एकूण रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे. यामुळे ४.५८ लाख गृहनिर्माण प्रकल्प असलेल्या १६०० रखडलेल्या योजना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. हा २५,००० कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम दिली जाईल.

निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, जे गृहप्रकल्प (एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स) आहेत किंवा जे गृहप्रकल्प (एनसीएलटी) आहेत अशा प्रकल्पांनाही या योजने अंतर्गत निधी मिळणार आहे. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारा हा पर्यायी गुंतवणूक निधी स्वस्त गृहप्रकल्प किंवा मध्यमवर्गीय गृहप्रकल्पांसाठी सुद्धा देण्यात येईल.

परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गृहनिर्माण क्षेत्रातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून हे आर्थिक मदत देण्यात येत आहे. या रकमेपैकी १०,००० कोटी रुपये सरकार देणार आहे तर इतर १५,००० कोटी रुपयांची रक्कम इतर स्त्रोतांकडून उपलब्ध केली जाणार आहे. ज्यामध्ये भारतीय स्टेट बँक (एसबीआय), भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन (एलआयसी) हे निधीस मदत करणार आहेत.

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या, अनेक घर खरेदीदारांनी सांगितले की त्यांनी अॅडव्हान्स पेमेंट करुनही फ्लॅटचा ताबा मिळत नाही. आकडेवारीनुसार, १,६०० हून अधिक गृहनिर्माण प्रकल्प अद्याप रखडलेले आहेत. ज्या गृहप्रकल्पांचं काम सुरु झालं आहे आणि तो जर पूर्ण झाला नाही तर त्या प्रकल्पाला मदत करण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...