PFI वर बंदी घालताच मोठी कारवाई; अब्दुल सत्तार पोलिसांच्या ताब्यात, पण...

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 28, 2022 | 15:07 IST

Central Government banned on PFI for 5 years : पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारने ही कारवाई केली आहे. 

PFI's General Secretary Abdul Sathar detained: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. भारतामध्ये बेकायदा कारवायांसाठी संघटीत झाल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. (Central Government banned on PFI for 5 years after this general secretary abdul sathar detained by police watch video)

केंद्र सरकारने पीएफआयवर घातलेल्या बंदीनंतर केरळमधील पीएफआयचे जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तारला ताब्यात घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने पीएफआयसोबतच इतरही काही संघटनांवर अशाच प्रकारे बंदीची कारवाई केली आहे. यामध्ये पीएफआय, आरआयएफ, सीएफआय, एआयआयसी, एनसीएचआरओ, नशनल वुमेन फ्रंट, एम्पावर इंडिया फाऊंडेशन, रिहॅब फाऊंडेशन या संघटनांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी