Mann Ki Baat: 'मन की बात' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, 28 सप्टेंबरला होणार बदल

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 25, 2022 | 13:56 IST

Prime Minister Narendra Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मन की बात (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली.

थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मन की बात (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले.
  • या दरम्यान पीएम मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली.
  • 28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवाचा विशेष दिवस येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 नवी दिल्ली:  Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मन की बात (Mann Ki Baat)  या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. यादरम्यान पीएम मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली. 28 सप्टेंबर रोजी भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चंदीगड विमानतळाचे (Chandigarh Airport) नाव बदलण्यात येणार असल्याचे सांगितले. 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी 

28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवाचा विशेष दिवस येत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या दिवशी आपण शहीद-ए-आझम भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहे. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चंदीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले.  पंतप्रधानांनी त्यांच्या 'मन की बात'मध्ये ही माहिती दिली.

अधिक वाचा-  Oily Skin साठी घरगुती स्क्रब, एकदा वापरून बघाच

चंदीगड विमानतळाच्या नावावरून पंजाब आणि हरियाणामध्ये बराच काळ वाद सुरू होता. अनेक बैठकीनंतर विमानतळाला शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यावर एकमत झाले. ऑगस्टमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि हरियाणाचे उपमुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत विमानतळाला भगतसिंग यांचे नाव देण्यावर सहमती झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी