आधीही सांगितलंय, मी आताही सांगतोय, मी तुमच्यासोबत आहे: पंतप्रधान मोदी 

चांद्रयान 2 चा लँडर विक्रमशी मध्यरात्री संपर्क तुटला. 2.1 किलोमीटरवर असताना लँडर विक्रमशी हा संपर्क तुटला गेला. या पार्श्वभूमीवर मोदींनी आज सकाळी देशाला संबोधित करून शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवलं आहे.

PM Modi
आधीही सांगितलंय, मी आताही सांगतोय, मी तुमच्यासोबत आहे: पंतप्रधान मोदी   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • जेव्हा लँडर चंद्र पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर वर होता तेव्हा संपर्क तुटला.
  • चंद्राला स्पर्श करण्याचा आपला संकल्प अधिक मजबूत झाला आहे- पंतप्रधान मोदी
  •  आपल्या अवकाश शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे असंख्य लोकं अधिक चांगलं जीवन जगत आहेत- मोदी

बंगळुरूः  काल रात्री चंद्रावर उतरताना चंद्रयान -2 'लँडर' विक्रमचा ग्राऊंड स्टेशनशी संपर्क तुटला. जेव्हा लँडर चंद्र पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर वर होता तेव्हा संपर्क तुटला. इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'चंद्राला स्पर्श करण्याचा आपला संकल्प अधिक मजबूत झाला आहे. आपण अगदी जवळ आलो होतो पण आपल्याला अजून पुढं जावं लागणार आहे.  आपल्या अवकाश शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे असंख्य लोकं अधिक चांगलं जीवन जगत आहेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. 

पंतप्रधान मोदींच्या भाषणातल्या मुद्द्यांवर एक नजर 

  • संबोधित केल्यानंतर मोदींनी घेतली शास्त्रज्ञांची भेट 

देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगळुरूच्या इस्रो केंद्रात शास्त्रज्ञांची भेट घेतली आणि त्यांचं मनोबल वाढवलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी इस्त्रोचे प्रमखु सिवन यांची गळाभेट घेतली. त्यानंतर सिवन भावूक झाले. 

 

 

  • चंद्राला स्पर्श करण्याचा संकल्प आणखीन मजबूत- पंतप्रधान मोदी 

चंद्राला स्पर्श करण्याचा संकल्प आणखीन मजबूत झाला आहे. आपण खूप जवळ पोहोचलो होतो पण आपल्याला आणखी पुढे जायचं आहे.  जेव्हा यानशी संपर्क तुटला, तो क्षण मी सुद्धा तुमच्यासोबत अनुभवला, आपलं धैर्य आणखी दृढ झालं आहे. 

 

 

  • पंतप्रधान मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले की, तुमचं तत्वज्ञान प्रेरणा देतात 

तुमचं तत्वज्ञान प्रेरणा देतात. जिथे शास्त्रज्ञ स्वप्न साध्य करतात. मी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. 

  • आपल्याया यश येईपर्यंत थांबायचे नाही आहे- पंतप्रधान मोदी

आपण निश्चितच यशस्वी होऊ. २१ व्या शतकात भारताची स्वप्न पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. तुम्हा सर्वांना येणाऱ्या मिशनसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. विज्ञान देखील आपल्या परिणामातून नवनवीन संधी शोधत असतात आणि तुमच्या मूल्यामध्येही आहे. त्यासाठी संपूर्ण देशाला तुमच्यावर गर्व आहे. 

 

 

  • आपला ऑर्बिटर आताही चंद्राच्या अवतीभवती फिरत आहे- मोदी 

चांद्रयानचा शेवटचा टप्पा जरी अपेक्षेप्रमाणे झाला नसली तरी आपला प्रवास शानदार आणि जानदार ठरला आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान देशानं अनेकदा आनंद साजरा केला आहे. यावेळी आपला ऑर्बिटर पूर्ण अभिमानानं चंद्राच्या भोवती फेऱ्या मारतोय. 

  • संपूर्ण देश तुमच्यासोबत- पंतप्रधान मोदी 

परिणाम आपल्या जागेवर आहे, मात्र मला आणि पूर्ण देशाला तुमच्या प्रयत्नांचा अभिमान आहे. मी रात्री सुद्धा म्हणालो होतो आणि आताही सांगत आहे की देश तुमच्यासोबत आहे. प्रत्येक कठिण काम, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते आणि यामुळे आपलं भविष्यातील यश निश्चित होते. माझा असा विश्वास आहे की जर ज्ञानाचा सर्वात मोठा शिक्षक कोणी असेल तर ते विज्ञान आहे. विज्ञानात यश मिळत नाही मात्र प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोग नवीन शक्यतांना जन्म देतो. 

 

 

  • भारत तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उत्तम काम केलं- पंतप्रधान मोदी

शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही देशाचा गौरव केला आहे. बर्‍याच नवीन क्षेत्रात शोध घेण्याच्या संधी आहेत. गेल्या अनेक रात्री शास्त्रज्ञ झोपलेले नाहीत. आपण आपल्या मार्गापासून परावृत्त होत नाही. तुम्ही लोणीवर रेघ मारणारे नाहीत तर दगडावर रेघ मारणारे लोकं आहात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी