Chief Minister Uddhav Thackeray's mafiagiri says Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफियागिरी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले मुंबईचे पोलीस आयुक्त संजय गुप्ता आपले कर्तव्य विसरून माफियागिरीला मदत करत आहेत. त्यांना ठराविक गोष्टी दिसतात बाकी काही दिसत नाही, असा आरोप भाजपच्या किरीट सोमय्या यांनी केला. शिवसेनेचे संजय राऊत उघडपणे राणा दाम्पत्याला धमकी देतात. पण पोलीस कारवाई करत नाहीत. कोर्टाकडून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला वारंवार चपराक बसत आहे; असेही किरीट सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफियागिरी थांबविण्यासाठी किरीट सोमय्या लढत राहणार, असेही त्यांनी सांगितले.