LACवर भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप

Chinese expert backs India's streangth भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची बाजू मजबूत आहे. लष्करीदृष्ट्या भारत वरचढ झाला आहे.

Chinese expert backs India's streangth
LAC भारत ऑन टॉप, चीन झाला फ्लॉप 

थोडं पण कामाचं

  • भारत चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची बाजू मजबूत
  • भारताची पँगाँग लेक परिसरातील मोहीम यशस्वी
  • लडाखच्या पूर्वेकडील भागात भारत 'ऑन टॉप' असल्यामुळे चीनची बाजू कमकुवत

लडाख: भारत (India) चीन (China) दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (Line of Actual Control - LAC) भारताची बाजू मजबूत आहे. लडाखच्या (Ladakh) पूर्वेकडील भागात (Eastern Area of Ladakh) पँगाग लेक (Pangong Tso Lake/Pangong Lake/पँगाँग त्सो लेक) परिसरातील सर्व उंच डोंगरांवर भारताने मजबूत मोर्चेबांधणी केली आहे. या मोर्चेबांधणीमुळे भारताला चीनच्या प्रत्येक लष्करी हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवणे शक्य होत आहे. चीन ज्या सैन्य तळांना आणि रस्त्यांना स्वतःची ताकद समजत होता आज त्यातील बहुसंख्य जागा भारतीय लष्कराच्या फायरिंग रेजमध्ये (firing range) आल्या आहेत. तसेच सर्व जागांवर चिनी हालचालींवरती लक्ष ठेवून पुढील योजना आखणे भारतासाठी सोपे झाले आहे. लष्करीदृष्ट्या भारत वरचढ झाला आहे. (Chinese expert backs India's streangth)

चीनने भारत कमकुवत आहे, आपण पुढे सरसावल्यास काही करणार नाही असे समजून घेराव घालण्याचा डाव आखला. मात्र गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या (Special Frontier Force - SFF) जवानांनी चीनचा उधळला. एसएफएफच्या नेतृत्वाखाली सैन्याने डोंगरांवर मोर्चेबांधणी केली. यामुळे चीनच्या योजना कागदावरच राहिल्या. गलवान खोऱ्यात (galwan valley) चिनी जवानांशी झालेल्या प्राणघातक संघर्षामुळे (India-China Faceoff) भारताचा आत्मविश्वास वाढला होता. या वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर भारताने पँगाँग लेक परिसरातील मोहीम यशस्वी केली. 

सध्याच्या स्थितीत लडाखच्या पूर्वेकडील भागात भारत 'ऑन टॉप' असल्यामुळे चीनची बाजू कमकुवत झाल्याचे निरीक्षण चिनी संरक्षणतज्ज्ञ गॉर्डन जी चँग (Gordon G. Chang) यांनी नोंदवले. अमेरिकेतील 'न्यूज वीक'मध्ये त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. ते लेखात म्हणतात, अपयश झाकण्यासाठी स्थानिक पातळीवरचे चिनी अधिकारी पुढील काही काळ वारंवार भारतीय तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील. पण भारताची स्थिती मजबूत असल्यामुळे चीनसाठी यश मिळवणे कठीण आहे. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला (People's Liberation Army - PLA) मिळालेल्या अपयशाचे चीनच्या राजकीय व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. लवकरच पीएलएमधील अधिकाऱ्यांच्या पातळीवरही बदल दिसू शकतात, असे मत गॉर्डन जी चँग यांनी व्यक्त केले.

चीनमध्ये अनेक वर्षांपासून असा मतप्रवाह आहे की भारत हा एक कमकुवत देश आहे. तिथे निर्णय प्रक्रियेत वेळ वाया जातो. या कालावधीत चीन स्वतःच्या फायद्याच्या स्थितीत पोहोचतो. याच कारणामुळे वारंवार घुसखोरीचे प्रयत्न करुन चीनने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र १९६२चा भारत आणि आताचा भारत यात प्रचंड फरक आहे. भारत फक्त बचावात्मक धोरण अवलंबत राहील हा चीनचा गैरसमज आहे. आणखी धाडसी प्रयोग केल्यास चीन-भारत संघर्ष (India-China Standoff) वेगळ्या स्थितीत पोहोचू शकतो. भारत आक्रमक होऊ शकतो, अशी शक्यता गॉर्डन जी चँग यांनी व्यक्त केली. त्यांनी परिस्थितीचे भान राखण्याचा सल्ला चीनला दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी