चीनने LACजवळ आणली शस्त्र, कराराचे उल्लंघन; फोटो Times Nowच्या हाती

Chinese troops carried carbines, spears at LAC चीनच्या सैन्याने कराराचे उल्लंघन केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्र आणली. टाइम्स नाऊच्या हाती चीनच्या कृतीचे फोटो आले आहेत.

Chinese troops carried carbines, spears at LAC
चीनने LACजवळ आणली शस्त्र 

थोडं पण कामाचं

  • चीनने LACजवळ आणली शस्त्र, कराराचे उल्लंघन; फोटो Times Nowच्या हाती
  • चिनी सैनिक कार्बाइन, सळया, लोखंडी पट्ट्या घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आले
  • भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते चिनी सैनिक

लडाख: चीनच्या सैन्याने (Chinese Troops) कराराचे उल्लंघन केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्र आणली. टाइम्स नाऊच्या (Times Now) हाती चीनच्या कृतीचे फोटो (Photo) आले आहेत. चिनी सैन्य भारतीयांवर हल्ला करण्याच्या उद्देशानेच शस्त्र घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control - LAC) आले. मात्र भारतीय सैन्याच्या (Indian Jawan) भक्कम मोर्चेंबांधणीमुळे त्यांचा टिकाव लागला नाही. (Chinese troops carried carbines, spears at LAC)

चिनी सैनिक कार्बाइन, सळया, लोखंडी पट्ट्या घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आले होते. त्यांचा प्रयत्न भारतात घुसखोरी करुन भारतीय सैनिकांवर हल्ला करणे आणि भारताचा भूभाग बळकावणे हा होता. मात्र सावध असलेल्या भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना हुसकावून लावले.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ४५ वर्षांनंतर गोळीबार

शांतता राखण्यासाठी भारत आणि चीन यांनी एक करार केला आहे. या करारामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्रांचा वापर केला जात नाही. या कराराचे उल्लंघन करुन चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ शस्त्र आणली. चिनी सैनिक घुसखोरीच्या प्रयत्नात होते. हा प्रयत्न यशस्वी होत नसल्यामुळे चिनी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात भारताची हानी झाली नाही. मात्र १९७५ नंतर तब्बल ४५ वर्षांनी पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गोळीबाराची घटना घडली. हा गोळीबार चीनने केला. 

भारत-चीन तणावात वाढ

सातत्याने करारांचे उल्लंघन करणाऱ्या चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ युद्धसदृश स्थितीत असते तशा स्वरुपाची सैन्याची नियुक्ती केली. चीन करारांचे उल्लंघन करत आहे. गलवान (galwan valley) आणि पँगाँग त्सो लेक (Pangong Tso Lake) (पँगाँग सो  लेक किंवा पँगाँग लेक) परिसरात चीनने घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीन ज्या पद्धतीने हालचाल करत आहे त्यामुळे तणाव वाढला आहे. 

भारताचे सैन्य 'हाय अलर्ट'वर

ताज्या घडामोडींनंतर भारताचे सैन्य 'हाय अलर्ट'वर आहे. भारताचे लष्कर, हवाई दल आणि नौदल कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. अनेक डोंगरांवर भारताने खांद्यावरुन क्षेपणास्त्र हल्ला करणाऱ्या प्रशिक्षित सैनिकांना नियुक्त केले आहे. तोफा, क्षेपणास्त्र, क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र, आधुनिक शस्त्र यांच्यासह सैनिक चिनी आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. 

लढाऊ विमानांद्वारे दर तासाला हवाई टेहळणी

हवाई दलाची लढाऊ विमानं दर तासाला लडाख आणि भोवतालच्या परिसराची हवाई टेहळणी (air surveillance) करत आहेत. रडार आणि उपग्रह यांच्या मदतीने चिनी सैन्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (Border Roads Organisation - BRO) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्त्यांच्या कामाला वेग दिला आहे. भारताची एक युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाली आहे. अमेरिकेच्या युद्धनौकांशी समन्वय ठेवून ही युद्धनौका युद्धसज्ज स्थितीत आहे. अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी चीनवरील दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी