जम्मू ढगफुटी: भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

Cloudburst in Ramban: जम्मूच्या रामबन भागात गुरुवारी ढगफुटीची घटना घडली असून ढगफुटीनंतर वाहून आलेल्या ढिगाऱ्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.

cloudburst in ramban in jammu ndrf deployed jammu srinagar highway closed video
भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद, जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद 
थोडं पण कामाचं
  • जम्मूच्या रामबन भागात ढगफुटी
  • सखल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात
  • माती-दगडांच्या वाहून आलेल्या ढिगाऱ्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

Cloudburst in Jammu: जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu- Kashmir)  नैसर्गिक आपत्ती ही सुरूच आहे. गुरुवारी जम्मूच्या रामबन भागात ढगफुटीची (Cloudburst) घटना घडली आहे. ढगफुटीनंतर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडाचे ढिगारे मुख्य रस्त्यांपर्यंत वाहून आले आहेत. ज्यामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग (Jammu-Srinagar) बंद करण्यात आला आहे. यावेळी जम्मूमधील प्रशासनाने लोकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. (cloudburst in ramban in jammu ndrf deployed jammu srinagar highway closed video)

दरम्यान, जम्मूमधील मेहर येथे पुरामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीतून लोकांची सुटका करण्यासाठी आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. पुराच्या तडाख्याने महामार्ग पूर्णपणे दगड आणि मातीने व्यापला आहे. या पुरात अनेक दुचाकी व वाहने वाहून गेल्याचे वृत्त आहे.

अधिक वाचा: Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, भल्या पहाटे राधानगरी धरणाचे उघडले दरवाजे

अर्धा देश पाऊस-पुराच्या विळख्यात

पुराचा जोरदार प्रवाह पाहून लोक घरे सोडून सुरक्षित स्थळी जाताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास अर्धा देश पाऊस आणि पुराच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्येही मुसळधार पावसाने कहर केला आहे.

अधिक वाचा: Mumbai Local Train: धावत्या लोकलमध्ये महिलेसोबत छेडछाड; आरोपीला पकडून प्रवाशांनी धू-धू धुतला आणि...

कुल्लूमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. रतलाम, बस्तर आणि इंदूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बस्तरमध्ये पुरासारखी परिस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे इंदूरमध्ये नाले तुडुंब भरले आहेत. 

महाराष्ट्रातही पावसाचं धुमशान

गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसानं (Rain)  धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दुसरीकडे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात देखील पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. तर कोल्हापुरातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

अधिक वाचा: Mumbai : मुंबईच्या तलावांमध्ये ९२.६२ टक्के पाणीसाठा

कोल्हापुरातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसानं धुमशान घातलं आहे. या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे. या पावसामुळे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच धरणाचा स्वयंचलित दरवाजा देखील उघडण्यात आला होता. यावेळी एका दरवाज्यातून प्रतिसेकंद 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली असल्यानं यंत्रणाही सतर्क झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलं आहे. तसंच आंबेवाडी आणि चिखली गावातील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. दरवर्षी या दोन गावांना महापुराचा सर्वात जास्त फटका बसतो. याच पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्यात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी