Shrikant Tyagi: श्रीकांत त्यागी प्रकरणी मुख्यमंत्री योगींनी २४ तासात मागवला अहवाल

Shrikant Tyagi News: 'शिवराळ' श्रीकांत त्यागीच्या अटकेसाठी नोएडा पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत. दरम्यान, श्रीकांत त्यागीने नोएडा न्यायालयात आत्मसमर्पण करण्यासाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे.

cm yogi seeks report within 24 hours in shrikant tyagi case
Shrikant Tyagi: श्रीकांत त्यागी प्रकरणी मुख्यमंत्री योगींनी २४ तासात मागवला अहवाल  |  फोटो सौजन्य: YouTube

Shrikant Tyagi News: नोएडाचा 'शिवराळ' भाजप नेता श्रीकांत त्यागी गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत असून तो अद्यापही पकडला गेलेला नाही. त्याचवेळी, आता नोएडा म्हणजेच गौतम बुद्ध नगर पोलिसांनी श्रीकांत त्यागीबद्दल माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 

आज नोएडा प्राधिकरणाने त्यागी याच्या घरावरील बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांकडून संपूर्ण अहवाल मागवला आहे. त्यामुळे प्रशासनाला येत्या २४ तासात या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल उत्तर प्रदेश सरकारला पाठवावा लागणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी