UP Elections 2022 : राहुल, प्रियांकाच्या अनुपलब्धतेमुळे काँग्रेसच्या UP तील सभा रद्द

Uttar Pradesh assembly Elections 2022 : राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत तर प्रियांका गांधी होम क्वारंटाइन आहेत. यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील पुढील पंधरा दिवसांत होणार असलेल्या पक्षाच्या सर्व सभा रद्द केल्या आहेत.

Congress cancels its big political rallies in UP also postpones its 'Ladki Hun Lad Sakti Hun' marathon
राहुल, प्रियांकाच्या अनुपलब्धतेमुळे काँग्रेसच्या UP तील सभा रद्द  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राहुल, प्रियांकाच्या अनुपलब्धतेमुळे काँग्रेसच्या UP तील सभा रद्द
  • उत्तराखंड, पंजाब आणि गोवा राज्यातील सभा होणार की नाही हे काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाही
  • काँग्रेसच्या मॅरेथॉन पण रद्द

Congress cancels its big political rallies in UP also postpones its 'Ladki Hun Lad Sakti Hun' marathon : लखनऊ : राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत तर प्रियांका गांधी होम क्वारंटाइन आहेत. यामुळे काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील पुढील पंधरा दिवसांत होणार असलेल्या पक्षाच्या सर्व सभा रद्द केल्या आहेत. कोरोना संकटाचे कारण पुढे करत काँग्रेसने पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील सभा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. पण उत्तराखंड, पंजाब आणि गोवा राज्यातील सभा होणार की नाही हे काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाही. 

मंगळवारी ४ जानेवारी रोजी बरेली येथे काँग्रेसच्या 'लड़की हूं लड़ सकती हूं' मॅरेथॉन स्पर्धेत चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेवरुन काँग्रेसवर सर्व पक्षीयांकडून जोरदार टीका सुरू झाली. यानंतर काँग्रेसने कोरोनाचे कारण पुढे करत पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील पुढील पंधरा दिवसांत होणार असलेल्या सभा आणि मॅरेथॉन रद्द केल्याचे जाहीर केले.

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राहुल गांधी १५ जानेवारी रोजी पंजाब, १६ जानेवारी रोजी गोवा आणि १८ जानेवारी रोजी उत्तराखंड येथे सभा घेणार आहेत. तसेच प्रियांका गांधी ९ जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये सभा घेणार आहेत. या सभा होणार की नाही हे काँग्रेस पक्षाने अद्याप जाहीर केलेले नाही. 

उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून सर्व पक्षांच्या मोठ्या सभांवर बंदी घालावी आणि छोट्या सभा, नाक्यावरच्या सभा, चौकातील सभा यांना परवानगी द्यावी; अशी मागणी केली आहे. 

काँग्रेसच्या भूमिकेवर समाजवादी पक्षाने टीका केली आहे. राहुल आणि प्रियांका उपलब्ध नाही म्हणून काँग्रेसने पुढील काही दिवसांच्या सभा रद्द केल्या आहेत. सर्व सभा रद्द केल्याचे जाहीर केले नाही. राज्यातल्या सरसकट सर्व सभांवर बंदी घालायची की नाही याचा निर्णय राज्याच्या निवडणूक आयोगाला नाही तर राज्य सरकारला घ्यायचा आहे; असे समाजवादी पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी