Congress: राहुल की प्रियंका, कोण होणार Congressचा पुढचा अध्यक्ष?; पुढच्या महिन्यात निवडणूक

Congress President:पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये (September) संघटनेची निवडणूक होणार आहे. दरम्यान अशा स्थितीत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Rahul Gandhi
राहुल गांधी 
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसचा (Congress) पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे.
  • पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये (September) संघटनेची निवडणूक होणार आहे.
  • पुढील अध्यक्षाबाबत काँग्रेसमध्ये चर्चा आणि अंदाज लावणं हे वाढलं आहे.

नवी दिल्ली:  Congress will get its next president: सध्या काँग्रेसचा (Congress) पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. आतापासूनच याची जोरदार चर्चा आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये  (September) संघटनेची निवडणूक होणार आहे. दरम्यान अशा स्थितीत पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर अध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये अनेक चर्चा सुरू आहेत. राहुल गांधींना (Rahul Gandhi) पुन्हा अध्यक्षपदी विराजमान व्हावे, असे मानणारा एक गट आहे, तर एक गट प्रियंका गांधींना (Priyanka Gandhi) अध्यक्ष बनवण्याच्या बाजूनं आहे.

काँग्रेस पुढे करू शकतो दलित चेहरा

गांधी कुटुंबाच्या जागी पक्ष दलित चेहऱ्याला अध्यक्ष करू शकतो, असंही सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र पुढील अध्यक्षाबाबत काँग्रेसमध्ये चर्चा आणि अंदाज लावणं हे वाढलं आहे. राहुल गांधी पुढे आल्यास त्यांची बिनविरोध निवड होण्याची खात्री असल्याचंही सूत्रांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा-  प्रेग्‍नेंसीमध्ये करू नयेत 'ही' घरगुती कामं 

राहुल यांनी 2019 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. पुढील महिन्यात संघटनेची निवडणूक होणार आहे, अशा स्थितीत काँग्रेसच्या अध्यक्षपदावर एक नेता विराजमान होणार असल्याचं मानलं जात आहे. मात्र अध्यक्ष कोण होणार याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. राहुल गांधी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असे काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांना वेळोवेळी आमच्या भावनांची जाणीव करून देत असतो. आम्हाला आशा आहे की ते पुढे येतील आणि पदभार स्वीकारतील.

एका वर्ग पाहतोय प्रियंका गांधींच्या बाजूनं

प्रियंका गांधी यांना अध्यक्षपदावर पाहण्याची इच्छा काँग्रेसमध्ये दुसऱ्या गटाला आहे. प्रियंका यांना अध्यक्ष करण्याबाबत पक्षात एकमत नसल्याचं सूत्रांकडून समजतंय. प्रियंका अध्यक्षपदी राहू नयेत असाही एक गट आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी