Coronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी

 Coronavirus in India LIVE News: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू आहे. भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. 

coronavirus news in marathi coronavirus cases live updates india delhi
Coronavirus in India LIVE News: भारतात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह, पीएम मोदी, शहा नाही साजरी करणार होळी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  •  चीनमधून जगभरात पसरलेला खतरनाक कोरोना व्हायरस 
  •  आतापर्यंत ३००० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.  ९०००० पेक्षा अधिक लोकांना संक्रमण झाले आहे.  
  •  नोएडामध्ये कोरोना व्हायसर संशयितमध्ये ३ मुलांसह ६ जणांचे नमुने घेतले त्यांची टेस्ट नेगेटीव्ह आहे. 

 नवी दिल्ली :  गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोना व्हायरस समोर आला आहे. त्यानंतर याचे रुपांतर आता महामारीत झाले. त्यानंतर हा सुमारे ७० देशांमध्ये याचा फैलावर झाला. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगात ३००० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ९० हजार व्यक्तींना याची बाधा झाली आहे. दुसरीकडे जागतिक बँकेने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध देशांना मदत म्हणून १२ अब्ज डॉलरची मदत घोषित केली आहे. या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. दिल्लीत प्रकरण समोर आल्यानंतर एनसीआरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात आतापर्यंत २८ केस पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यात तीन जण बरे झाले आहेत. 

भारतात सध्या २५ केस पॉझिटिव्ह आहे - हर्षवर्धन 

कोरोना व्हायरस संदर्भात भारतात घेतलेल्या खबरादारीबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, आम्ही अधिकारी आणि दिल्ली सरकारसोबत बैठक घेतली आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड बनविण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटलला सुविधा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. आग्रा येथील एका कुटुंबातील ६ जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दिल्ली एक केस होती, त्याने ६६ जणांशी संपर्क केला होता. आम्ही दिल्ली सरकारसोबत मिळून काम करत आहोत. १२ देशांतून आलेल्या लोकांची स्क्रिनिंग सुरू आहे. एअरपोर्टमधील नागरिकांची तपासणी सुरू आहे. इटलीतून आलेल्या १६ जणांना कोरोनाची व्हायरसची बाधा झाली आहे. त्यात एक भारतीयाचा समावेश आहे. भारतातून इराणला शास्त्रज्ञ पाठविण्यात येणार आहे. बाहेर देशातून आलेल्यांची स्क्रिनिंग केली जात आहे. मंगळारी सायंकाळपर्यंत ५ लाख ८९ हजार लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. केरळमध्ये जे पण पॉझिटिव्ह सापडले होते. ते बरे झाले आहेत. आतापर्यंत भारतात २८ जण पॉझिटिव्ह सापडले आहे. यात ९ भारतीय आणि १६ इटलीचे नागरिक आहेत. यात ३ बरे झाले आहेत. टेस्टसाठी १५ लॅब बनविण्यात आल्या आहेत. तसेच १९ आणखी बनविण्यात येणार आहेत. या संदर्भात दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. 

२५ संशयित रुग्ण सफदरजंग रुग्णालयात, ४ आरएमएलमध्ये 

आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस बाधित २५ संशयित रुग्णांना सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसच्या ४ संशयितांना दाखल करण्यात आले आहे. 

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा नाही साजरी करणार होळी 

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून सांगितले की मी यंदा होळी साजरी करणार नाही. पंतप्रधानांना कोरोना व्हायरसमुळे तज्ज्ञांनी हा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी समारंभात सामिल होण्यास मनाई केली आहे. 

केंद्रीय मंत्री अमित शहा यांना ट्विट करून म्हटले की होळी भारतीयांसाठी एक महत्त्वाचा सण आहे. पण कोरोना व्हायरसमुळे या वर्षी मी होळी मिलन समारंभात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्वांना सार्वजनिक समारंभांपासून दूर राहण्याचा आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचे आव्हान करतो. 

मास्क घालून संसदेत पोहचल्या खासदार 

कोरोना व्हायरसची भीती सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अपक्ष खासदार नवनीत राणा मास्क घालून संसदेत दाखल झाल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी