नवी दिल्ली : देशातील काही राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज पत्रकार परिषद घेत देशभरातील कोरोना परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत जी माहिती समोर आली आहे ती महाराष्ट्रासाठी चिंताजनक असल्याचं दिसत आहे. (coronavirus updates 8 districts of maharashtra state has covid-19 active cases in India check full data)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या टॉप 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे. पाहूयात कुठले आहेत हे जिल्हे आणि काय आहे स्थिती.
देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेले 10 जिल्हे
(फोटो सौजन्य: PIB Youtube screengrab)
महाराष्ट्रासोबतच इतरही राज्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
11 मार्च 2021 दुपारी 1 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 2.56 कोटी कोविड प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 67 लाख व्यक्ती 60 वर्षांहून अधिक वयाचे आणि 45-60 वयोगटातील सहव्याधी असलेल्या आहेत. खासगी क्षेत्राच्या सहकार्याने लसीकरणाला वेग आला आहे. 71% लसीकरण सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांवर झाले आहे आणि 29% लसीकरण खासगी केंद्रांवर करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सचिवांनी दिली आहे.