Cyclone Vayu: 'वायू' चक्रीवादळाचा वेग मंदावला

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2019 | 14:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cyclone Vayu Updates: 'वायू' चक्रीवादळ अत्यंत गंभीर श्रेणीत पोहोचलं होतं. चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेने ७० ट्रेन्स रद्द केल्या आहेत. तसेच अनेक विमानांचं उड्डाणही रोखण्यात आलं आहे.

Fisherman drag boats, Cyclone Vayu in Veraval
'वायू' चक्रीवादळाचा वेग वाढला  |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबामुळे निर्माण झालेलं वायू चक्रीवादळ महाराष्ट्रापासून पुढे गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. वायू चक्रीवादळामुळे ताशी १८० किमी इतक्या वेगाने वारे वाहत असून हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर आज धडकणार आहे. वायू चक्रीवादळाची स्थिती पाहता प्रशासनाने हाय अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचे सर्व उपाय करण्यात आले आहेत. किनारपट्टीच्या परिसरातील तब्बल १ लाख ६० हजार नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच एनडीआरएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. तटरक्षक दल, नौदल आणि ३०० मरिन कमांडोही सज्ज आहेत.

गुजरातच्या विविध शहरांकडे जाणाऱ्या तब्बल ७० ट्रेन्स पश्चिम रेल्वेने रद्द केल्या आहेत. तर २८ ट्रेन्स गुजरातमधील समुद्र किनारपट्टीच्या जवळ असलेल्या रेल्वे स्थानकांपासून दूर असलेल्या स्थानकातच रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून समुद्र किनारी जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे. वायू चक्रीवादळामुळे गुजरातच्या समुद्रात मोठ-मोठ्या लाटा उसळत असल्याचं पहायला मिळत आहे.

वायू चक्रीवादळाचे अपडेट्स

 

 1. गुजरातच्या समुद्र किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता
 2. चक्रीवादळ वेरावल, पोरबंदरच्या जवळून पुढे सरकणार - हवामान विभाग
 3. वायू चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार नाही - हवामान विभाग
 4. महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावर नागरिकांना जाण्यास बंदी 
 5. वायू चक्रीवादळामुळे समुद्र किनारी जोरदार वारे, जोरदार वाऱ्यांमुळे सोमनाथ मंदिराच्या परिसरातील प्रवेशद्वाराच्या छताचा काही भाग कोसळला
 6. दुपारच्या सुमारास गुजरातमधील पोरबंदर भागात चक्रीवादळ धडकणार
 7. नागरिकांनी समुद्र किनारपट्टीपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
 8. प्रशासनातर्फे सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना
 9. समुद्रकिनारी हवेचा वेग वाढला
 10. १ लाख ६० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं
 11. गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता 
 12. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 
 13. दुपारच्या सुमारास गुजरातमध्ये धडकणार वायू चक्रीवादळ

 

चक्रीवादळाची गंभीर स्थिती लक्षात घेत सुरक्षिततेचा उपाय म्हणून वेरावल, ओखा, पोरबंदर, भावनगर, भुज आणि गांधीधाम रेल्वे स्थानकांवर जाणाऱ्या एक्सप्रेस, मेल  मध्येच थांबवण्यात आल्या आहेत. तसेच बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळपर्यंत अनेक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायू चक्रीवादळ अत्यंत गंभीर श्रेणीत पोहोचलं आहे आणि गुरूवारी दुपारपर्यंत गुजरातमधील वेरावल ते द्वारिका या किनारपट्टीच्या भागांत कधीही धडकण्याची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Cyclone Vayu: 'वायू' चक्रीवादळाचा वेग मंदावला Description: Cyclone Vayu Updates: 'वायू' चक्रीवादळ अत्यंत गंभीर श्रेणीत पोहोचलं होतं. चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेने ७० ट्रेन्स रद्द केल्या आहेत. तसेच अनेक विमानांचं उड्डाणही रोखण्यात आलं आहे.
Loading...
Loading...
Loading...