Deer Rescue Video: पुराच्या पाण्यात अडकलं हरिण, प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव टाकला धोक्यात; Watch Video

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 27, 2022 | 17:15 IST

Deer Rescue Video: एका व्यक्तीने ज्या पद्धतीने हरणाची (Deer) सुटका केली त्यामुळे त्यानं सर्व लोकांची मने जिंकली आहेत. त्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

थोडं पण कामाचं
  • या मुसळधार पावसामुळे माणसांपासून प्राण्यांपर्यंत जगणं कठीण झालं आहे.
  • सोशल मीडियावर दररोज एक एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Videos) येत असतात.
  • राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधून (Jodhpur) एक व्हिडिओ समोर आला आहे.

राजस्थान:  Deer Rescue Video: सध्या देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rains)  पडत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. या मुसळधार पावसामुळे माणसांपासून प्राण्यांपर्यंत जगणं कठीण झालं आहे.

अधिक वाचा- तब्बल 8  वर्षानंतर 'चला हवा येऊ द्या' मध्ये खूप मोठा बदल, श्रेयानंच सांगितलं सारं काही...

सोशल मीडियावर दररोज एक एक धक्कादायक व्हिडिओ (Shocking Videos) येत असतात.  राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधून (Jodhpur) एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतील व्यक्तीनं जे कार्य केलं आहे ज्यामुळे त्यानं सर्वच लोकांची मने जिंकली आहेत. कारण, जीवावर खेळून एका व्यक्तीनं हरणाचा जीव वाचवला आहे. 

जोरदार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात एक हरिण अडकलं होतं.  त्या व्यक्तीनं त्याला वाचवण्यासाठी काय केले हे पाहून लोक थक्क झाले. तुम्हीही पाहा व्हिडिओमध्ये काय आहे संपूर्ण प्रकरण?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी