CCTV VIDEO : मोबाइल लुटल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेले

Delhi: Bike-borne snatchers caught on cam dragging woman on road for 200 metres : दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात मोबाइल स्नॅचिंग अर्थात मोबाइल खेचून लुटण्याचा प्रकार घडला. अडविण्याचा प्रयत्न केला म्हणून मोबाइलधारक तरुणीला चोरट्यांनी  फरफटत नेले आणि रस्त्यात सोडून दिले.

Delhi: Bike-borne snatchers caught on cam dragging woman on road
मोबाइल लुटल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेले 
थोडं पण कामाचं
  • मोबाइल लुटल्यानंतर चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेले
  • घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड
  • पोलीस तपास सुरू

Delhi: Bike-borne snatchers caught on cam dragging woman on road for 200 metres : नवी दिल्ली : दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात मोबाइल स्नॅचिंग अर्थात मोबाइल खेचून लुटण्याचा प्रकार घडला. अडविण्याचा प्रयत्न केला म्हणून मोबाइलधारक तरुणीला चोरट्यांनी  फरफटत नेले आणि रस्त्यात सोडून दिले. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली. पोलीस सीसीटीव्ही फूटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती याआधारे तपास करत आहेत. 

घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. तरुणी शालीमार बाग परिसरातील रस्त्यावरुन जात होती. मागून एका बाइकवरुन दोनजण वेगाने आले. बाइकवर बसलेल्यांपैकी मागे असलेल्या व्यक्तीने तरुणीच्या हातातील पर्स जोरात खेचली. याच सुमारास बाइक चालवत असलेल्याने वेग वाढवला. बाइकवरुन आलेल्या दोघांचा पर्समधील मोबाइल चोरून पळून जाण्याचा प्रयत्न सुरू होता. पण तरुणीने चोरट्यांपैकी एकाचे जॅकेट हातात घट्ट धरले. हे पाहून बाइक चालवत असलेल्या व्यक्तीने बाइकचा वेग वाढवला. 

चोरट्यांनी बाइक वेगाने पळवली आणि जॅकेट धरुन ठेवणारी मुलगी रस्त्यावरुन फरफटत त्यांच्या मागून जात होती. या पद्धतीने चोरट्यांनी तरुणीला फरफटत नेले. अखेर तरुणीच्या हातून जॅकेट सुटले आणि तरुणीला तिथेच रस्त्यावर सोडून चोरट्यांनी वेगाने पळ काढला. घडलेला प्रकार बघणाऱ्यांनी तरुणीच्या दिशेने धाव घेतली आणि तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. 

दिल्लीत बाइकवरुन वेगाने येऊन सोनसाखळी किंवा मोबाइल किंवा पर्स खेचून पळ काढण्याचे प्रकार अनेकदा घडतात. यामुळे भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्ली पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे शहरातील नेटवर्क आणखी वाढवावे अशीही मागणी स्थानिक करत आहेत. प्रामुख्याने चोरटे जिथे वास्तव्य करतात त्या भागांची नियमित तपासणी तसेच संशयास्पद लोकांची सखोल चौकशी केली तर अनेक गुन्हे उघडकीस येतील, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या काही सार्वजनिक भागांमध्ये अपुरा प्रकाश किंवा मिट्ट काळोख या समस्या जाणवतात. या भागांमध्ये दिव्यांची आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली तर भुरट्या चोरांना आळा घालणे आणखी सोपे होईल; असेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी