Tiranga Bike Rally : लाल किल्ला ते संसद तिरंगा बाइक रॅली

Tiranga Bike Rally : भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आज (बुधवार ३ ऑगस्ट २०२२) लाल किल्ला ते संसद अशी तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली.

Tiranga Bike Rally
Tiranga Bike Rally : लाल किल्ला ते संसद तिरंगा बाइक रॅली  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Tiranga Bike Rally : लाल किल्ला ते संसद तिरंगा बाइक रॅली
  • रॅलीत अनेक मंत्री आणि खासदार बाइकवर बसून आणि हातात तिरंगा घेऊन सहभागी
  • जनजागृतीसाठी बाइक रॅली

Tiranga Bike Rally : भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आज (बुधवार ३ ऑगस्ट २०२२) लाल किल्ला ते संसद अशी तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली. या रॅलीत अनेक मंत्री आणि खासदार बाइकवर बसून आणि हातात तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) या मोहिमेंतर्गत जनजागृतीसाठी बाइक रॅली काढण्यात आली. (Delhi: Tiranga Bike Rally for MPs being taken out from Red Fort The rally will end at Vijay Chowk near the Parliament)

मोहिमेत प्रामुख्याने सत्ताधारी एनडीएचे मंत्री आणि खासदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. रॅली केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीयमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड सहभागी झाले होते. 

'भारतात स्वातंत्र्याचा उत्सव सुरू आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आज आपण मोकळ्या आकाशात श्वास घेऊ शकत आहोत' असे बाइक रॅलीच्या आरंभी बोलताना राज्यवर्धन सिंह राठोड म्हणाले.

तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देशात एकजुटीचा संदेश देण्यात आला. एक असा उत्सव साजरा होत आहे ज्यात देशातील सर्व नागरिक सहभागी होत आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने नागरिक एकत्र येत आहेत, देश आणखी मजबूत होत आहेत. पण या एवढ्या महत्त्वाच्या उत्सवापासून विरोधक दूर होते. या मुद्यावर राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विरोधकांवर टीका केली. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. पण काही जण तिरंग्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. पण विरोधक विरोध करायचा म्हणून सरसकट सगळ्या बाबींना विरोध करत आहेत. एकदा त्यांनी चिंतन करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी तिरंगा नको म्हणून विरोधक चिनी झेंडा पण हाती घेऊ शकतात; अशा शब्दात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी विरोधकांवर टीका केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी