Delhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक 

Reporter assulted by Kapil Mishra's supporters: भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या सभेत टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक झाली आहे. नेत्याला केलेल्या प्रश्नावर भडकली एक समर्थक

delhi violence times now reporter heckled kicked assulted by kapil mishra supporters for questioning him
Delhi violence: कपिल मिश्राच्या रॅलीमध्ये टाइम्स नाऊच्या महिला रिपोर्टरशी गैरवर्तणूक, प्रश्नावर भडकली समर्थक   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  दिल्लीच्या उत्तर पूर्व भागात नागरिकता संशोधन कायदा (सीएए) संदर्भात उसळलेल्या हिंसाचारात कपिल शर्मा यांचे नाव पुन्हा पुन्हा समोर येत आहे. त्यांच्यावर दंगल भडकण्यापूर्वी भडकाऊ भाषण देण्याचे आरोप आहे. आता कपिल शर्मा यांनी शांती रॅली काढली आहे. यात त्यांनी पत्रकारांना बोलावले होते. पण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास ते तयार नव्हते. भाजप नेत्याच्या अशाच एका रॅलीमध्ये टाइम्स नाऊ च्या महिला पत्रकाराशी गैरवर्तणूक झाल्याचा प्रकार घडला. या महिला पत्रकाराने कपिल मिश्रा यांना प्रश्न विचारला, ते त्याचं उत्तर देण्यास तयार नव्हते. 

पत्रकारांनी केले प्रश्न 

दिल्ली झालेल्या हिंसाचाराला शांत करण्यासाठी प्रयत्न करताना कपिल मिश्रा यांनी जंतर-मंतर यांनी शांती रॅलीचे आयोजन केले आहे. ज्यात पत्रकारांनाही बोलावले होते. या दरम्यान टाइम्स नाऊची रिपोर्टनं परवीना सह इतर चॅनलच्या रिपोर्टरने काही प्रश्न विचारले. त्यांना या प्रश्नाचे उत्तरं हवी होती. ते एका पाठोपाठ भाजप नेत्यांवर प्रश्न झाडत होते. पण कपिल मिश्रा कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. त्यांच्या वागणुकीमुळे स्पष्ट झाले की पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर देण्यास तयार नव्हते. 

भडकली समर्थक  

या दरम्यान टाइम्स नाऊच्या पत्रकाराने कपिल शर्मांवर प्रश्नांचा भडीमार केला तर एका समर्थकाने परवीना यांच्यावर हल्ला केला. तिने टाइम्स नाऊच्या पत्रकाराला धक्काबुक्की करायला सुरूवात केली. या दरम्यान, रिपोर्टर म्हणत होती की तुम्ही बोलावले आहे तर आम्हांला प्रश्न का विचारले जाऊ दिले जात नाही. ते प्रश्नाचे उत्तर का देत नाही. या दरम्यान, त्या ठिकाणी एक तरूणी बसली होती. तीने उठून टाइम्स नाऊच्या पत्रकारावर हल्ला केला. त्यानंतर तेथील काही जणांनी मध्यस्थी करून तरूणीला शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही पत्रकारावर त्या तरूणीने हात उचलला. 

मिश्रांचा आडमुठेपणा 

या दरम्यान, कपिल मिश्रा सतत आपल्या आडमुठेपणावर कायम होते. आपल्या भूमिकेवर ठाम राहत भाजप नेत्याने म्हटले की त्यांना प्रश्न विचारले जात नाही जे देशाला तोडण्याची भाषा करतात. ज्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब मिळाले आहे. पण ज्याने रोड सुरू करण्याची विनंती केली. ज्यामुळे ३५ लाख लोकांना त्रास होत होता. त्यालाच दहशतवादी म्हटले जाद आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...