Devkinandan Thakur : जमतील तेवढी मुलं जन्माला घाला, कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा सल्ला

Devkinandan Thakur said until population control law comes every sanatani should birth 5 to 6 children : जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा येत नाही. तोपर्यंत जमतील तेवढी मुलं जन्माला घाला. प्रत्येक सनातनी दांपत्याने किमान पाच सहा मुलं जन्माला घालावी. यासाठी वेळेत लग्न करावे, असा सल्ला कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी दिला.

Devkinandan Thakur said until population control law comes every sanatani should birth 5 to 6 children
जमतील तेवढी मुलं जन्माला घाला, कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा सल्ला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जमतील तेवढी मुलं जन्माला घाला
  • कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांचा सल्ला
  • जाणून घ्या कोण आहेत कथावाचक देवकीनंदन ठाकूर

Devkinandan Thakur said until population control law comes every sanatani should birth 5 to 6 children : जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा येत नाही. तोपर्यंत जमतील तेवढी मुलं जन्माला घाला. प्रत्येक सनातनी दांपत्याने किमान पाच सहा मुलं जन्माला घालावी. यासाठी वेळेत लग्न करावे, असा सल्ला कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी दिला. सनातनी बोर्डाची स्थापना करा. या बोर्डवर धर्माचार्यांना नेमावे; असेही कथावाचक देवकीनंदन ठाकूर म्हणाले. 

लोकसंख्येची झपाट्याने वाढ होत आहे. काही घरात 4 बायका आणि 40 मुलं असतात. पण यावर कोणी काही बोलत नाही. स्वातंत्र्यानंतरचं सनातनवरील हे सर्वात मोठं आक्रमण आहे असे कथावाचक देवकीनंदन ठाकूर म्हणाले.

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारची मोठी भेट, 2 महिन्यांचा पगार होणार

MHADA Lottery: म्हाडा घरांच्या लॉटरीतील वास्तव्याची अट रद्द करण्याची भाजपची मागणी

कोण आहेत कथावाचक देवकीनंदन ठाकूर ?

कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांना कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज या नावानेही ओळखले जाते. ते कथावाचक, गायक आणि अध्यात्मिक गुरु अशी स्वतःची ओळख सांगतात. अनेकांनी यांना टीव्हीवरील डीबेट शो आणि यू ट्युबवर बघितले आहे.  

देवकीनंदन ठाकूर महाराज हे 1997 पासून श्रीमद भागवत कथा, श्री राम कथा, देवी भागवत, शिव पुराण कथा, भगवत गीता आदी विषयांवर प्रवचन देत आहेत. त्यांना 2015 चा यूपी रतन हा पुरस्कार मिळाला आहे. 

उत्तर प्रदेशमधील मथुरेतल्या ओहावा येथे 12 सप्टेंबर 1978 रोजी देवकीनंदन ठाकूर यांचा जन्म झाला. त्यांनी सहाव्या वर्षी घर सोडले. वृंदावन येथे गेले. पुढे तिथेच लहानाचे मोठे झाले असे सांगतात. 

देवकीनंदन ठाकूर यांच्या वडिलांचे नाव राजवीर शर्मा आणि आईचे नाव अनसुईया देवी. बालपणी आईमुळे देवकीनंदन ठाकूर यांना कथा ऐकण्याचे वेड लागले. पुढे वृंदावन येथे वास्तव्य केल्यानंतर देवकीनंदन ठाकूर यांनी लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव अंदमाता आणि मुलाचे नाव देवांश असे आहे. 

सामान्यांसारखे जगावे, असे आवाहन देवकीनंदन ठाकूर अनेकदा कथा सांगताना अथवा प्रवचन करताना करत असतात. देवकीनंदन ठाकूर यांनी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन ग्रॅज्युएशन केले आहे. सनातन भारतीय संस्कृती या विषयात त्यांनी अध्ययन केले आहे. आचार्य पुरुषोत्तम शरण शास्त्री यांच्या मार्गदर्शनात देवकीनंदन ठाकूर यांनी धर्मग्रंथांशी संबंधित अभ्यास केला आहे. आचार्यांनी त्यांची बोलण्याची कला बघून देवकीनंदन यांना कथावाचक होण्याचा सल्ला दिला. गुरुच्या सूचनेचे पालन करत देवकीनंदन ठाकूर कथावाचक झाले. ते आजही त्यांच्या कामात आनंदी आहेत. 

देवकीनंदन ठाकूर यांनी सुमारे 900 वेळा परदेशात कथावाचन आणि प्रवचन असा कार्यक्रम केला आहे. त्यांची नेट वर्थ 5 ते 7 कोटी आहे असे प्राथमिक वृत्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी