Hathras Case: 'DM नी माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली, आमचे फोन हिसकावले'

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 02, 2020 | 17:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hathras case: हाथरस प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकार सातत्याने सवालाच्या चक्रव्यूहामध्ये अडकत आहे.पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरून सवाल केले जात आहेत. आता पिडीताच्या कुटुंबियांनीही पोलिसांवर आरोप केले आहेत. 

hathras case
'DM नी माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली,आमचे फोन हिसकावले' 

थोडं पण कामाचं

  • हाथरस गँगरेप पीडितेच्या मृत्यूनंतर सातत्याने हे प्रकरण चर्चेत
  • पीडित मुलीच्या कुटुंबियांनी प्रशासनावर केले गंभीर आरोप
  • पिडीत मुलीच्या भावाने सांगितले, आमचा फोन हिसकावून घेतला

हाथरस - हाथरस प्रकरणावरून(hathras gangrape case) उत्तर प्रदेश पोलीस(uttar pradesh police), सरकार(government) आणि प्रशासनाच्या भूमिकेवर सातत्याने सवाल केले जात आहे. पीडित तरुणीच्या(victim) कुटुंबियांनी आरोप केला की त्यांना सरकारकडून अडकवण्यात आले आहे आणि कुटुंबातील सदस्ययांचे मोबाईलही हिसकावून घेतले आहेत. इतकंच नव्हे तर संपूर्ण हाथरसमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून पीडित कुटुंबियांच्या गावात जाणारे प्रत्येक रस्ते सील करण्यात आले असून तेथे येण्यास बंदी घातली आहे. हाथरस प्रकरणात आजही देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने केली जात आहेत. लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 

पिडितेच्या भावाने केले गंभीर आरोप

पीडित तरूणीचा भाऊ कसाबसा पोलिसांची नजर चुकवून शेतातील रस्त्यावरून धावत मीडियासमोर पोहोला. मृत तरुणीच्या भावाने सांगितले की, आम्हाला घाबरवले गेले होते. आमचा फोनही हिसकावून घेतला ज्यामुळे आम्ही कोणाला बोलावू शकणार नाही. सगळ्यांचे फोन हसिकावले. कोणालाही बाहेर येऊ दिले जात नाही आहे. आमची आई आणि वहिनीने म्हटले होते की मीडियाला बोलवा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचे आहे. मी शेतातून लपून छपून इथपर्यंत पोहोचलो आहे. डीएम साहेबांनी काल माझ्या काकांच्या छातीवर लाथ मारली. आम्हाला सगळ्यांना रूममध्ये बंद केले. पोलिसांचा पहारा चारही बाजूंनी आहे. 

हाथरसमध्ये पीडितेचे गाव पोलिसांनी असे काही सील केले आहे की जसे काही किल्लेबंदी झाली आहे. मीडियाकर्ते आणि पोलीसांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात पोलीस मीडियाच्या लोकांना गावात घुसण्यास रोखले जाते. हे असेच सुरू आहे. या बाबत ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांना सवाल केले असता ते म्हणतात की आम्ही फक्त आमची ड्युटी करतोय आणि वरून आदेश आहे यासाठी कोणाला गावात जाऊ द्यायचे नाही आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी