Earthquake and Chandra Grahan : चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे भूकंप? काय आहे ग्रहण आणि भूकंपाचं कनेक्शन?

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 09, 2022 | 17:22 IST

Earthquake and Chandra Grahan connection: 8 नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण झाले आणि त्यानंतर काही तासांनी भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे आता चंद्रग्रहण आणि भूकंप यांचं काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घेऊयात या संदर्भात ज्योतिष आणि विज्ञान काय सांगतं...

Lunar eclipse and earthquake connection: 8 नोव्हेंबर 2022 रोजी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण झालं. हे चंद्रग्रहण झाल्यावर रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचं केंद्रबिंदू हे भारताच्या शेजारील नेपाळमध्ये होतं. तेथे भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. दिल्ली, नोएडा, लखनऊसह उत्तरभारतात या भूकंपाचा प्रभाव जाणवला. रात्री अचानक घरातील पंखे, बेड हलण्यास सुरुवात झाली. अर्ध्या रात्री आलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भूकंप, वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा चंद्रग्रहणासोबत काही संबंध आहे का? जाणून घ्या या संदर्भात सविस्तर... (earthquake hits nepal is there any connection of chandra grahan lunar eclipse)

धार्मिक मान्यतेनुसार, चंद्रग्रहणाचा परिणाम हा जल आणि समुद्र यांच्यावर होतो. यामुळे पूर, वादळ, भूकंप येण्याची शक्यता वाढते. खासकरुन चंद्रग्रहणानंतर भूकंप येण्याची शक्यता अधिक असते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. ज्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा समुद्राच्या भरतीवर परिणाम होतो. यामुळेच भूकंप येण्याचा धोका अधिक वाढतो.

विज्ञानानुसार, चंद्रग्रहण आणि भूकंप यांचा थेट असा कोणताही संबंध नाहीये. मात्र, गेल्या काही वर्षांतील चंद्रग्रहण आणि त्यानंतरआलेल्या भूकंपांची आकडेवारी पाहिली तर चंद्रग्रहणानंतर किंवा त्यापूर्वी भूकंप येण्याच्या वृत्ताला नाकारता येणार नाही. यापूर्वीही चंद्रग्रहणाच्या काही दिवस आधी किंवा नंतर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

चंद्रग्रहण - 9 जानेवारी 2001
भूकंप - 26 जानेवारी 
ठिकाण - भारत

चंद्रग्रहण - 9 नोव्हेंबर 2003
भूकंप - 17 नोव्हेंबर 
ठिकाण - अलास्का

चंद्रग्रहण - 28 ऑक्टोबर 2004
भूकंप - 23 ऑक्टोबर 
ठिकाण - जापान

चंद्रग्रहण - 3 मार्च 2007
भूकंप - 6 मार्च 
ठिकाण - सुमात्रा

चंद्रग्रहण - 28 ऑगस्ट 2007
भूकंप - 15 ऑगस्ट  
ठिकाण - पेरू

चंद्रग्रहण - 21 फेब्रुवारी 2008
भूकंप - 21 फेब्रुवारी 
ठिकाण - इंडोनेशिया

चंद्रग्रहण - 21 डिसेंबर 2010
भूकंप - 21 डिसेंबर 
ठिकाण - जापान

चंद्रग्रहण - 31 जानेवारी 2018
भूकंप - 31 जानेवारी 
ठिकाण - भारत आणि पाकिस्तान

चंद्रग्रहण - 17 जुलै 2019
भूकंप - 24 जुलै 2019 
ठिकाण - महाराष्ट्र

चंद्रग्रहण - 5 जून 2020
भूकंप - 15 जून 
ठिकाण - गुजरात

चंद्रग्रहण - 8 नोव्हेंबर 2022
भूकंप - 8 नोव्हेंबर 
ठिकाण - भारत आणि नेपाळ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी