तुर्कीस्तान: Turkey Earthquake Updates : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामध्ये आतापर्यंत सुमारे 4000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. सध्या प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे. भारतानंही तुर्कीसाठी मदत पाठवली आहे. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत. सतत बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील हजारो घरं आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शोध आणि बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या भूकंपामध्ये आतापर्यंत तब्बल 6000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.