मेसेज वडिलांच्या मोबाइलवर 'सर तन से जुदा' मेसेज आला अन् तिकडे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळला

Crime News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आला आहे. इतकेच नाही तर या विद्यार्थ्याच्या मोबाइलवरुन त्याच्या वडिलांना एक मेसेज आला आहे आणि या मेसेजमुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

Engineering student nishank rathore found dead on railway track and father recived message sar tan se juda in bhopal watch video
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा ट्रॅकवर आढळला मृतदेह, 'त्या' मेसेजने वाढला सस्पेन्स 
थोडं पण कामाचं
  • इंजिनिअरिंगचा विद्यार्थी निशांकचा रेल्वे ट्रॅकवर आढळला मृतदेह
  • त्याच दरम्यान निशांकच्या वडिलांना आणि मित्रांच्या मोबाइलवर आला एक मेसेज
  • निशांकची हत्या की आत्महत्या? 

Engineering student nishank rathore found dead: एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आला आहे. रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक तरुणाचे नाव निशांक राठोड असे असून नर्मदापूरम रेल्वे स्टेशनजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. ज्यावेळी निशांकचा मृतदेह आढळून आला त्याचवेळी त्याच्या वडिलांच्या आणि मित्रांच्या मोबाइलवर एक व्हॉट्सअप मेसेज आला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं, "सर तन से जुदा". (Engineering student nishank rathore found dead on railway track and father received message sar tan se juda in bhopal watch video)

या मेसेजनंतर पोलीस विविध अँगलने आपला तपास करत आहेत. निशांक याने आत्महत्या केली की हत्या केली याबाबत आता पोलिसांचा तपास सुरू आहे. निशांक हा भोपाळमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. घटनास्थळावरुन पोलिसांना कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळालेली नाहीये. धक्कादायक म्हणजे ज्यावेळी निशांकचा मृतदेह आढळून आला त्यावेळी त्याच्या वडिलांच्या मोबाइलवर मेसेज आला. त्यामुळे प्रश्न असा उद्भवत आहे की, निशांकचा मृत्यू झाला होता तर मग त्याचा मोबाइल कोण ऑपरेट करत होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी