इराणमधील हिजाब विरोधी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 06, 2022 | 08:51 IST

ex united states secretary of state mike pompeo support iran hijab protest : अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी इराणमधील महिलांच्या आंदोलनाला अमेरिकेचा पाठिंबा आहे अशा स्वरुपाचे वक्तव्य जाहीरपणे केले. 

थोडं पण कामाचं
  • इराणमधील हिजाब विरोधी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा
  • अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी इराणमधील आंदोलनाला जाहीर केला पाठिंबा
  • हिजाब विरोधात इराणमध्ये महिलांचे आंदोलन

ex united states secretary of state mike pompeo support iran hijab protest : इराणमध्ये हिजाब विरोधात महिलांचे आंदोलन सुरू आहे. महिला आणि मुली रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. इराणमध्ये हिजाब घालण्याचा कडक कायदा असूनही अनेक ठिकाणी महिलांनी हिजाब उतरवून निषेध व्यक्त केला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. या आंदोलनाला अमेरिकेतून उघड पाठिंबा मिळत आहे. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी इराणमधील महिलांच्या आंदोलनाला अमेरिकेचा पाठिंबा आहे अशा स्वरुपाचे वक्तव्य जाहीरपणे केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी