Caught On Camera: हेलियम गॅस सिलिंडरचा स्फोट; 1 ठार, अनेकजण जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 03, 2022 | 16:35 IST

कोट्टई वासल परिसरात हा स्फोट झाला, हा एक मोठा बाजार परिसर आहे.  सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी ग्राहकांची मोठी गर्दी होती. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्रिची : तमिळनाडूतील (Tamil Nadu) त्रिचीमधील (Trichy) एका भरगच्च भरलेल्या बाजारपेठेत  (marketplace) रविवारी रात्री हेलियम गॅस सिलिंडरचा (cylinder) स्फोट (explosion) झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी घडली असून या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहे.  (explosion of helium gas cylinders; 1 killed, many wounded )

अधिक वाचा  : डान्स गरबा आहे भन्नाट,वजन कमी करण्यासह होतात हे फायदे

कोट्टई वासल परिसरात हा स्फोट झाला, हा एक मोठा बाजार परिसर आहे.  सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी ग्राहकांची मोठी गर्दी होती. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  अचनाकपणे स्फोट झाल्याने नागरिक भयभीत झाले होते.  या स्फोटात अनेकजण जखमी झाले आहेत, यात एका 13 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

अधिक वाचा  : Recruitment: तब्बल 346 जागांसाठी बँक ऑफ इंडियात भरती

तर बाजारपेठेजवळ पार्क केलेल्या गाड्याच्या काचा फुटल्या आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर मत्तू रवीची मृतक म्हणून ओळख पटवली आणि त्यांनी स्फोटाची नेमकी वेळ टिपणाऱ्या सीसीटीव्ही प्रतिमाही गोळा केल्या आहेत. 

#explosion #latestnews #tamilnadunews

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी