Ankita Bhandari Murder Case: कुटुंबीयांनी अंकिताचं अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Sep 25, 2022 | 11:11 IST

Ankita Bhandari Murder Case: अंकिता हत्या प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिताच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अंत्यसंस्कार केले जातील.

Ankita Bhandari Murder Case
अंकितावर अंत्यसंस्कार करण्यासा कुटुंबीयांचा नकार, केली 'ही' मागणी 
थोडं पण कामाचं
  • फॉरेन्सिक तपासणीनंतरच अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.
  • आज म्हणजेच रविवारी अंकितावर (Ankita) अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.
  • आज श्रीनगरच्या आयटीआय घाटावर अंकितावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.

उत्तराखंड: Ankita Bhandari Case:  आज म्हणजेच रविवारी अंकितावर (Ankita) अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर (postmortem report) कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतरच अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांचे म्हणणे आहे. अंकिता भंडारी हत्येप्रकरणी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) संताप व्यक्त होत आहे. तर आज श्रीनगरच्या आयटीआय घाटावर अंकितावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. 

अंकिता भंडारी यांचा भाऊ अजय सिंह भंडारी यांनी सांगितले की, 'तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येईपर्यंत आम्ही तिच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही. तिला मारहाण करून नदीत फेकून दिल्याचं आम्ही तिच्या प्रोव्हिजनल रिपोर्टमध्ये पाहिले. मात्र आम्ही अंतिम रिपोर्टची वाट पाहत आहोत.

अधिक वाचा- 1 ऑक्टोबरपासून स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो स्वस्त, जाणून घ्या 

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड 

अंकिता भंडारीच्या प्रोव्हिजनल रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. तीन डॉक्टरांच्या पॅनलने दिलेल्या रिपोर्टनुसार अंकिताच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. या सर्व खुणा मृत्यूपूर्वीच्या आहेत.

मात्र प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, अंकिताचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला. मात्र आरोपींनी अंकिताला बेदम मारहाण करून नंतर तिला कालव्यात फेकून दिल्याचं स्पष्ट झाले आहे. सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्ट आज येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी