Tractor Parade: ट्रॅक्टर परेडमध्ये शेतकरी हिंसक, आयटीओवर पोलिसांनी लाठीचार्ज [व्हिडिओ]

शेतकर्‍यांची ट्रॅक्टर परेड हिंसक झाली आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने आयटीओ गाठला आणि त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्याचा आग्रह धरला.

farmers violent in tractor parade police jeep and bus attacked
Tractor Parade: ट्रॅक्टर परेडमध्ये शेतकरी हिंसक 

थोडं पण कामाचं

  •  शेतकर्‍यांची ट्रॅक्टर परेड हिंसक झाली आहे.
  • शेतकऱ्यांच्या एका गटाने आयटीओ गाठला आणि त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्याचा आग्रह धरला.
  • यासह हिसंक आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने हातात  तलवार घेऊन पोलिसांना पळवले.

नवी दिल्ली :  शेतकर्‍यांची ट्रॅक्टर परेड हिंसक झाली आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने आयटीओ गाठला आणि त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्याचा आग्रह धरला. यासह हिंसक आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने हातात  तलवार घेऊन पोलिसांना पळवले. अशी परिस्थिती पाहता ग्रीन लाइन मेट्रोची 11 स्थानके बंद करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी ज्या परिस्थितीत ट्रॅक्टरच्या परेडची परवानगी दिली आहे, त्या परवानगीचे उल्लंघन होताना दिसत आहे. 

प्रश्न असा आहे की जेव्हा शेतकरी आणि पोलिस यांच्यात करार झाला की शेतकरी ठरलेल्या मार्गावर ट्रॅक्टर परेड काढतील, तेव्हा आयटीओपर्यंत कोणते शेतकरी  पोहचले.  यासह सकाळपासून दिल्ली पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्यात आले. दिल्लीच्या विविध भागातील शेतकरी आंदोलकांनी कायदा हातात घेतला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी