राफेल येत आहेत... फ्रान्समधून भारतासाठी ५ विमानांचे उड्डाण

First five Rafale jets take off from France for India फ्रान्समध्ये तयार झालेल्या पाच दसॉल्ट राफेल लढाऊ विमानांची तुकडी भारताच्या दिशेने रवाना झाली

First five Rafale jets take off from France for India
राफेल येत आहेत... फ्रान्समधून भारतासाठी ५ विमानांचे उड्डाण 

थोडं पण कामाचं

 • राफेल येत आहेत... फ्रान्समधून भारतासाठी ५ विमानांचे उड्डाण
 • भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलचे आगमन होणार
 • भारताचा फ्रान्ससोबत ३६ राफेलसाठी करार

नवी दिल्ली: फ्रान्समध्ये (France) तयार झालेल्या पाच दसॉल्ट राफेल (Dassault Rafale, French twin engine multirole fighter aircraft) लढाऊ विमानांची तुकडी भारताच्या (India) दिशेने रवाना झाली आहे. (First five Rafale jets take off from France for India)

ही विमानं हवेतच इंधन भरुन घेतील आणि न थांबता सात हजार किमी प्रवास करुन थेट संयुक्त अरब आमिराती येथे उतरतील. या ठिकाणी फ्रान्सच्या वायुदलाचे टँकर विमानांमध्ये पुन्हा इंधन भरतील. नंतर ही विमानं थेट भारतात हरयाणातील अंबाला विमानतळावर उतरतील. हवामान व्यवस्थित असल्यास विमानांचे आगमन २९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. 

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलचे आगमन होणार

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राफेलचे आगमन होत असल्यामुळे भारतीय वायुदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. घातक शस्त्र, आधुनिक रडार, इलेक्ट्रानिक युद्ध प्रणाली यामुळे ही विमानं वेगाने मोठा हल्ला करुन शत्रुचे प्रचंड नुकसान करण्यासाठी सक्षम आहेत. राफेलसाठी भारताने स्काल्प (SCALP Missile) आणि हॅमर (hammer missile) ही घातक क्षेपणास्त्र खरेदी केली आहेत.

जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे. प्रशिक्षित टीम अंबालामध्ये (Ambala) विमानांचा ताबा घेणार आहे.

फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली. या प्रसंगी भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ उपस्थित होते. त्यांनी राफेलमुळे भारताच्या सामर्थ्यात वाढ होणार असल्याचे सांगितले. अश्रफ यांनी राफेल घेऊन रवाना होत असलेल्या भारतीय वायुदलाच्या पथकाची भेट घेऊन त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 

भारताचा फ्रान्ससोबत ३६ राफेलसाठी करार

भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेलसाठी करार केला आहे. यातील पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत. आणखी पाच राफेल विमानांचा वापर फ्रान्समधील भारताच्या दुसऱ्या टीमच्या प्रशिक्षणासाठी सुरू आहे. भारताने मागणी केल्यास आदेश निघाल्यापासून ४८ तासांच्या आत ही पाच विमानं भारतात पोहोचतील असे फ्रान्सने सांगितले आहे. करारानुसार सर्व ३६ विमानांचा ताबा २०२१च्या अखेरपर्यंत मिळणार आहेत.

राफेलची वैशिष्ट्य

 1. भारत २८ एक आसनी आणि आठ दोन आसनी राफेल खरेदी करणार
 2. हवेतल्या हवेत इंधन भरुन घेण्याची क्षमता
 3. आवाजापेक्षा जास्त वेगाने उडणारे विमान
 4. ताशी वेग २,२२३ किमी
 5. मिनिटाला ६० हजार फूट या गतीने आकाशात जास्तीत जास्त उंची गाठून हल्ले करण्याची क्षमता
 6. हवेतल्या लढाईसाठी १२५ राऊंडची ३० मिमि आकाराच्या गोळ्यांची स्वयंचलित गन
 7. हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र
 8. हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र
 9. मोठ्या क्षमतेचे बॉम्ब
 10. ९५०० किलो वजनाचे १४ बॉम्ब घेऊन उड्डाण करण्याची क्षमता
 11. शत्रुच्या संपर्क यंत्रणा जॅम करणारी यंत्रणा 
 12. शत्रुच्या वैमानिकांचा संवाद ऐकण्याची क्षमता
 13. जमिनीवरील आणि हवेतील शत्रुवर जोरदार हल्ला करण्याची क्षमता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी