दुबई: Flood in UAE: वाळवंट असलेल्या देशात पूरसदृश (flood situation) परिस्थिती निर्माण होणे हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. संयुक्त अरब अमिरात (United Arab Emirates, UAE) या आखाती देशात (Gulf country) पूरस्थिती निर्माण झाली आहे. युएईमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain) आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने रास अल खैमाहमध्ये अनेक नाले आणि धरण वाहून गेले. मुसळधार पावसाचा फटका देशातील अनेक भागांना बसला आहे.
पुरात रहिवाशांची घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली. पुरामुळे लोक भयभीत आणि घाबरले आहेत. यूएईमध्ये 27 वर्षांनंतर एवढा मुसळधार पाऊस झाल्याचं सांगण्यात येत आहे. देशात सलग दोन दिवस पाऊस पडत आहे. फुजैराह बंदरात विक्रमी 255.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वेळी युएईमध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.
पावसामुळे जीवितहानी नाही
मिळालेल्या माहितीनुसार, या पुरामुळे लोक खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी किमान 870 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. शारजाह आणि फुजैराह येथील तात्पुरत्या छावण्यांमध्ये सुमारे 4,000 लोकांना ठेवण्यात आले आहे.
नॅशनल इमर्जन्सी क्रायसिस अँड डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे म्हणणे आहे की, गरज भासल्यास परिसरातील 20 हॉटेल्समध्ये 1885 लोकांची व्यवस्था केली जाईल. पुरात अडकलेल्या लोकांना सर्व प्रकारची मदत पोहोचवण्यासाठी मदत कर्मचारी 24 तास काम करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पूर आणि पावसामुळे देशात कोणाचाही मृत्यू झालेला नाही.