VIDEO: अमरावतीत माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेतकऱ्यांकडून चप्पलफेक

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 28, 2019 | 14:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Protest by farmers in Amaravati: आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

former cm n chandrababu naidu slipper hurled farmer support tdp chief amaravati andhra pradesh marathi news
VIDEO: अमरावतीत माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शेतकऱ्यांकडून चप्पलफेक  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर चप्पलफेक
  • आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून चप्पलफेक
  • अमरावतीत घडलेली घटना कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली: आंध्रप्रदेशातील अमरावती येथे बांधकामाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या बसवर चप्पल फेकण्यात आली आहे. टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे बसने व्यंकटापलेम येथून जात असताना ही घटना घडली आहे. हे शेतकरी चंद्राबाबू नायडू यांच्या अमरावती दौऱ्याला विरोध करत होते. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 'गो बॅक नायडू'च्या घोषणाही दिल्या.

अमरावती येथे सध्या सुरू असलेल्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यासाठी चंद्राबाबू नायडू हे गुरुवारी अमरावतीत पोहोचले. यावेळी चंद्राबाबू म्हणाले, हैदराबादच्या धर्तीवर आम्हाला अमरावती शहर हे सर्वोत्तम स्थान बनवायचे होते मात्र, जगन मोहन रेड्डी यांनी आमची ही योजना उधळून लावली.

अमरावती येथे पोहोचून चंद्राबाबू नायडू हे बांधकाम सुरु असलेल्या क्षेत्रांची पाहणी करणार होते तसेच काही शेतकऱ्यांच्या भेटी सुद्धा घेणार होते. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीला घेरलं तसेच कोणीतरी चंद्राबाबू नायडू यांच्या गाडीवर चप्पलही फेकली. यावेळी चंद्राबाबू नायडू यांचे कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात झटापटही झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

वायएसआर काँग्रेसच्या समर्थनार्थ नायडू यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. वायएसआर काँग्रेस पक्षाने चंद्रबाबू नायडू यांच्या अमरावती दौऱ्याला विरोध करणार असल्याचं यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार अमरावती येथे चंद्राबाबू नायडू यांच्या गाडीचा ताफा येताच शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी