माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अनंतात विलिन

सुषमा स्वराज यांचं निधन: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झालं आहे.

sushma_swaraj
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचं निधन
 • हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सुषमा स्वराज यांचं निधन
 • सुषमा स्वराज यांनी मोदी मंत्रिमंडळात उमटवला होता आपल्या कामाचा ठसा

नवी दिल्ली: देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचं आज (६ ऑगस्ट) काही वेळापूर्वीच निधन झाल्याचं प्राथमिक वृत्त समजतं आहे. सुषमा स्वराज यांना थोड्याच वेळापूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सुषमा स्वराज यांना रात्री १० वाजून २० मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. त्यांना तात्काळ आपातकालीन वॉर्डमध्ये नेण्यात आलं होतं. त्यांचं निधन कार्डियक अरेस्टने झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सुषमा स्वराज यांचं पार्थिव काही वेळापूर्वीच त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या अकरा वाजेपर्यंत त्याच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. तर त्यानंतर दुपारी १२ वाजता दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात ३ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यावेळी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजेनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिली. 

दरम्यान, याबाबतचं वृत्त समजताच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते हे एम्स रुग्णालयात पोहचले होते. याशिवाय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, पी. चिदंम्बरम हे देखील एम्स रुग्णालयात पोहचले होते. ६७ वर्षीय सुषमा स्वराज यांच्यावर २०१६ मध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत काही कुरबुरी सुरुच होत्या. पण तरीही त्यांनी आपला मंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. 

दरम्यान, निधनाच्या अवघ्या तीनच तासांपूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करणारं ट्वीटही केलं होतं. तीन तासापूर्वी ट्वीट करणाऱ्या सुषमा स्वराज यांचं अचानक निधन झाल्याने सगळ्यांचाच मनाला चटका लागून गेला.  

'पंतप्रधानजी तुमचं हार्दीक अभिनंदन.. मी माझ्या जीवनात हाच दिवस पाहायला मिळावा याची वाट पाहत होती.' हे शेवटचं ट्वीट त्यांनी केलं होतं.  

सुषमा स्वराज या मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पराराष्ट्र मंत्री होत्या. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री होण्याचा मानही पटकावला होता. 

प्रकृतीच्या कारणामुळेच सुषमा स्वराज यांनी २०१९ मध्ये लोकसभा  निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी त्यांचा मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा होती. पण शपथविधीच्या दिवशी हे स्पष्ट झालं की, स्वराज यांचा मंत्रिमंडळातही समावेश नसेल. स्वत: सुषमा स्वराज यांनीच प्रकृती अस्वास्थामुळे आपलं मंत्रिपद नाकारलं होतं. 

अपडेट्स:

 1. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अनंतात विलिन
 2. शासकीय इतमामात सुषमा स्वराज यांच्यावर अंत्यसंस्कार
 3. लोधी रोडच्या स्मशानभूमीत थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
 4. सुषमा स्वराज यांचं पार्थिव स्मशानभूमीत दाखल 
 5. सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात 
 6. सुषमा स्वराज यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे
  , भाजप मुख्यालयात दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार
 7. सुषमा स्वराज यांना राज्यसभेत सर्व सदस्यांनी वाहिली श्रद्धांजली 
 8. अमित शहा यांनी घेतलं सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 
 9. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन 
 10. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुषमा स्वराज यांच्या कुटुंबीयांचं केलं सात्वन, पंतप्रधान मोदी झाले भावूक
 11. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन  
 12. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन 
   
 13. योगगुरू रामदेव बाबा यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन 
 14. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा सुषमा स्वराज यांना वाहिली श्रद्धांजली 
 15. सुषमा स्वराज यांच्या निधनाने दिल्ली सरकारकडून दोन दिवसांचा दुखवटा जाहीर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं ट्विट 
 16. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करत म्हटलं, सुषमा स्वराज यांच्या निधनाने एक धक्का बसला आहे. 
 17. दुपारी ३ वाजता सुषमा स्वराज यांची अंत्ययात्रा निघणार, लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार
 18. सुषमा स्वराज यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी उद्या अकरा वाजेपर्यंत त्याच्या राहत्या घरी ठेवण्यात येणार.
 19. दुपारी १२ वाजता दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात ३ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यावेळी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे.
 20. दुपारी ३ वाजेनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिली. 
 21. भारतीय राजकारणातील एक गौरवशाली अध्याय संपुष्टात आला आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि गोरगरीबांच्या जीवनासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या उल्लेखनीय नेत्याच्या निधनाबद्दल भारत दु: खी झाला आहे. सुषमा स्वराजजी त्यांच्या प्रकारातील एक होती, ज्या कोट्यावधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या होत्या.
 22. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करत ट्विट केलं आहे.
 23. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुषमा स्वराज यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली 
 24. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्विट केलं
 25. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विटरवरून सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली
 26. सुषमा स्वराज यांचं निधन झालं

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...