Former Japanese PM Shinzo Abe shot in chest, rushed to hospital : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाला. एका सार्वजनिक कार्यक्रमात शिंजो आबे भाषण करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. प्राथमिक वृत्तानुसार शिंजो आबे यांच्या छातीत गोळ्या लागल्या आहेत. जखमी अवस्थेत शिंजो आबे यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेने मारेकऱ्याला अटक केली आहे आणि त्याने हत्येची कबुली दिली आहे.
शिंजो आबे २००९ पासून जपानचे पंतप्रधान होते. त्यांनी तब्येतीचे कारण देऊन २०२० मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
शिंजो आबे यांच्यावर 'नारा' (Nara) येथे सभा सुरू असताना पाठीमागून गोळीबार झाला. दोन गोळ्या शिंजो आबे यांना छातीत लागल्या आहेत. जखमी अवस्थेत शिंजो आबे यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. तेत्सुया यामागामी (४१ वर्षे, राहणारा : नारा) असे हल्लेखोराचे नाव असल्याचे समजते. त्याने 'नारा' (Nara) मध्ये सभा घेत असलेल्या शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबाराची घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. गोळीबार करणाऱ्याची पोलीस चौकशी सुरू आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही. मारेकऱ्याने हत्येची कबुली दिली आहे.
जपानच्या माजी पंतप्रधानांवर हल्ला करणाऱ्याने एका कॅमेरा गनचा वापर केला होता. थ्री डी प्रिंटरच्या मदतीने त्याने एक कॅमेऱ्यासारखी दिसणारी गन तयार केली होती. लांबून बघणाऱ्यास फोटो काढण्याचा कॅमेरा वाटेल अशी ही गन होती. यामुळेच सुरक्षा रक्षकांना चकवून गन घेऊन शिंजो आबे यांच्या सभास्थळी उपस्थित राहणे मारेकऱ्याला शक्य झाले. त्याने फोटो काढण्याच्या निमित्ताने शिंजो आबे यांच्यापासून काही अंतरावर स्टेजच्या मागील बाजूस उभे राहून गोळीबार केला. सुरुवातीला सर्वांना एक फोटोग्राफर गर्दीचा फोटो काढत असावा असे वाटले पण कॅमेऱ्यासारख्या गनमधून गोळीबार होताच सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला लगेच पकडले.
इस्रायलची संसद विसर्जित, चार वर्षात देशात पाचव्यांदा निवडणूक
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारतीय वेळेनुसार गुरुवार ७ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी राजीनामा दिला. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच जपानच्या माजी पंतप्रधानांवर गोळीबार झाला. या दोन घटनांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक चक्रावले आहेत.