Hillary Clinton in IEC 2022 : अमेरिकेचे २० वर्षात झाले नसेल एवढे नुकसान रशियाचे झाले, युक्रेन युद्धावर बोलल्या हिलरी क्लिंटन

Former US Secretary of State Hillary Clinton at India Economic Conclave 2022 says Invasion of Ukraine has been an eye-opener : अमेरिकेचे २० वर्षात झाले नसेल एवढे नुकसान रशियाचे झाले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे हे घडले, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

Former US Secretary of State Hillary Clinton at India Economic Conclave 2022 says Invasion of Ukraine has been an eye-opener
अमेरिकेचे २० वर्षात झाले नसेल एवढे नुकसान रशियाचे झाले 
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेचे २० वर्षात झाले नसेल एवढे नुकसान रशियाचे झाले
  • रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणावर बोलल्या हिलरी क्लिंटन
  • लोकशाहीप्रधान देशांनी हुकुमशाही पद्धतीने तसेच एकाधिकारशाहीने कारभार करणाऱ्यांविरुद्ध उभे राहणे आवश्यक - हिलरी क्लिंटन

Former US Secretary of State Hillary Clinton at India Economic Conclave 2022 says Invasion of Ukraine has been an eye-opener : अमेरिकेचे २० वर्षात झाले नसेल एवढे नुकसान रशियाचे झाले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे हे घडले, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन म्हणाल्या. 'टाइम्स नेटवर्क'च्या 'इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव २०२२' (India Economic Conclave 2022 - IEC 2022) या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जागतिकीकरणाच्या ताज्या स्थितीमुळे अमेरिका तसेच जगातील इतर लोकशाहीप्रधान देशांमधील लोकशाहीप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारत आणि अमेरिका जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पण जे अद्याप आर्थिक प्रगती आणि लोकशाहीच्या लाभांपासून वंचित आहेत अशांसाठी आपल्याला आणखी काम करावे लागेल, असेही हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण डोळे उघडण्याचे आणि जगाने नवे धडे शिकण्याचे निमित्त ठरले आहे. हे आक्रमण अनेक कारणांमुळे अनावश्यक आणि अयोग्य होते. पुतिन युक्रेन ताब्यात घेऊन त्याला रशियाशी जोडण्यास इच्छुक आहेत आणि त्यासाठीच हे आक्रमण आहे. पण युक्रेनच्या प्रतिकारामुळे परिस्थिती बदलली आहे. पुतिन यांच्यावर त्यांचाच डाव उलटत आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे एका महिन्यात रशियाचे जेवढे नुकसान झाले तेवढे तर अमेरिकेचे २० वर्षात झाले नाही, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या. 

बायडेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युरोप, नाटो आणि इतरांना संघटीत केले. हे एकत्र येणं रशियासाठी धोक्याची घंटा आहे. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण हे फक्त युक्रेनसाठीच नाही तर जागतिक लोकशाही व्यवस्थेसाठी धोक्याचे असल्यामुळेच बायडेन प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली आहेत, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या. 

पुतिन स्वतःचे सामर्थ्य वाढविण्यासाठी एका स्वतंत्र लोकशाहीप्रधान देशाचा बळी देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जागतिक व्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी बायडेन प्रशासन काम करत असल्याचे हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

नाटोने १९९० मध्ये रशियाला आमंत्रित केले होते. कारण नाटो रशियाला शत्रू नाही समजत नव्हती. जगाच्या प्रगतीसाठी सर्व देशांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध निर्माण व्हायला हवेत. नाटोचे आमंत्रण हे त्यासाठीचे पाऊल होते, असे हिलरी क्लिंटन यांनी सांगितले. 

फिनलंड आणि स्विडन हे देश कधीही नाटोचे सदस्य नव्हते. पण आता ते नाटोमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. रशियाचे शेजारी असलेल्या या देशांना स्वतःच्या सुरक्षेसाठी नाटोत सहभागी होणे आवश्यक वाटत आहे. सोव्हियत रशियाच्या विघटनापासूनच युरोपचा पूर्वेकडील भाग वेगवेगळ्या आव्हानांना सामोरा जात आहे. नव्या परिस्थितीत रशियाने दिलेल्या आव्हानाला जगाने ठोस प्रत्युतत्तर दिले आहे. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांनी रशियाची अर्थव्यवस्था डळमळीत होण्यास सुरुवात झाली आहे. हे युद्ध ताणले तर पुतिन यांच्यासाठी युद्धाकरिता पैसा उभा करणे हेच मोठे आव्हान होणार आहे, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

जगाने बघितले आहे की, चीन भारतीय सीमेवर कसे आक्रमण करत आहे. भारताचा भूभाग ताब्यात घेण्यासाठी कसा प्रयत्न करत आहे. ही सर्व उदाहरणे बघता जगातल्या सर्व लोकशाहीप्रधान देशांनी हुकुमशाही पद्धतीने तसेच एकाधिकारशाहीने कारभार करणाऱ्यांविरुद्ध उभे राहणे आवश्यक आहे. रशियाच्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेत विविधता आढळते. याच कारणामुळे चीन रशिया मैत्रीचा चीनला अपेक्षित फायदा झालेला नाही, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी