[VIDEO]: सेल्फी घेताना वीजांचा कडकडाट, होरपळून पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 07, 2019 | 20:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Man dies during selfie: दिल्लीहून गोव्याला पत्नीसह फिरायला आलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गोव्यातील बीचवर सेल्फी काढत असताना वीज कोसळून झालेल्या अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली.

goa beach selfie mobile phone lightning man died wife injured tourist couple delhi resident shocking news
[VIDEO]: सेल्फी घेताना वीजांचा कडकडाट, होरपळून पतीचा मृत्यू 

थोडं पण कामाचं

  • गोव्यातील धक्कादायक घटना
  • पत्नीसोबत सेल्फी घेताना वीज कोसळली
  • वीज कोसळून पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी
  • गोव्यातील कंडोलीम बीचवर घडली धक्कादायक घटना

गोवा: गोव्यामध्ये देशातूनच नाही तर परदेशातूनही पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. अशाच प्रकारे दिल्लीतील एक दाम्पत्य गोव्यात पर्यटनासाठी आले होते मात्र, काळाने घात केला. शुक्रवारी संध्याकाळी हे दाम्पत्य गोव्यातील कंडोलीम बीचवर सेल्फी घेत असताना त्यांच्यासोबत एक विचित्र अपघात घडला आणि या अपघातात पतीचा मृत्यू झाला.

गरोदर पत्नी गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ३५ वर्षीय चैतन्य हे आपल्या पत्नीसह गोव्यातील कंडोलीम बीचवर सेल्फी घेत होते. मात्र, त्याच दरम्यान अचानक वीजांचा कडकडाट झाला आणि त्यात चैतन्य यांचा मृत्यू झाला. तर चैतन्य यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. चैतन्य यांच्या पत्नी गरोदर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य नागपाल हे आपल्या पत्नीसह गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आले होते. मात्र, सेल्फी घेत असताना अचानक वीज कोसळली. वीज कोसळून झालेल्या या दुर्घटनेत चैतन्य नागपाल या इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

तेथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी सांगितले की, हे दाम्पत्य समुद्र किनाऱ्यावर उभे राहून सेल्फी काढत होते. त्यावेळी जोरदार वारा आणि वीजांचा कडकडाट झाला. त्याच दरम्यान या दाम्पत्याच्या किंचाळण्याचा आवाज आला त्यानंतर पाहिलं तर दाम्पत्य समुद्र किनाऱ्यावर पडलेले दिसून आले. या घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी