Google trends in 2019 India: टॉप सर्चेबल पर्सनॅलिटीजमध्ये ‘या’ व्यक्तीचं नाव अव्वल

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 13, 2019 | 15:53 IST

अभिनंदन वर्धमान हे भारतीय वायु सेनेचे अधिकारी आहेत. भारतात २०१९ वर्षात टॉप सर्चेबल पर्सनॅलिटीजमध्ये अभिनंदन वर्धमान यांना सर्वात जास्त सर्च केले आहे.

थोडं पण कामाचं

  • भारतात २०१९ वर्षात टॉप सर्चेबल पर्सनॅलिटीजमध्ये अभिनंदन वर्धमान यांना सर्वात जास्त सर्च केले आहे.
  • दुसऱ्या क्रमांकावार आहेत लता मंगेशकर आणि तिसऱ्या नंबरवर आहे युवराज सिंग.
  • लोकसभा निवडणुका आणि चांद्रयान-२ हेदेखील जास्त सर्च केले गेले आहे.

नवी दिल्ली: कोणत्याही गोष्टीबाबत, व्यक्तीबाबत आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर सर्वात आधी विचार येतो तो गुगलचा. जगात या एकमेव सर्च इंजिनवर लोकांचा पूर्ण विश्वास आहे. काहीही जाणून घेण्यासाठी लोक सहज गुगल करून पाहतात. आणि का नाही करणार... कारण गुगलसुद्धा तेवढीच नेमकी माहिती लगेच पुरवते. २०१९च्या सरतेशेवटी या वर्षातील काही महत्त्वपूर्ण घडलेल्या गोष्टी लोकांच्या अजूनही लक्षात आहेत.

भारतात यावर्षी लोकांनी काय, कोणाच्या बाबतीत तसेच निअर बाय मी कॅटेगरी याबाबतीत काय जास्त सर्च केले आहे याविषयीचा एक रिपोर्ट गुगलने जाहीर केला आहे. या रिपोर्टनुसार, भारतात यावर्षी टॉप ट्रेंड्समध्ये काय होतं आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये लोकांनी यावर्षी काय जास्त सर्च केले आहे याचा अहवाल सादर केला आहे. सामान्य कॅटेगरीचा विचार केला तर क्रिकेट वर्ल्ड कपला भारतात सर्वात जास्त सर्च केलेले आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुका आणि चांद्रयान-२ हेदेखील जास्त सर्च केले गेले आहे.

भारतात २०१९ वर्षात टॉप सर्चेबल पर्सनॅलिटीजमध्ये अभिनंदन वर्धमान यांना सर्वात जास्त सर्च केले आहे. म्हणजेच आपले कॅप्टन अभिनंदन वर्तमान हे २०१९ वर्षातील मोस्ट सर्चेबल पर्सनॅलिटी ठरले आहेत. यावर्षी दुसऱ्या क्रमांकावार आहेत लता मंगेशकर आणि तिसऱ्या नंबरवर आहे युवराज सिंग. चौथ्या क्रमांकावर आनंद कुमार आहेत, तर त्यानंतर विकी कौशल आणि ऋषभ पंत यांचा नंबर लागला आहे.

अभिनंदन वर्धमान हे भारतीय वायु सेनेचे अधिकारी आहेत. वायुदलात ते विंग कमांडर पदावर कार्यरत आहेत. तसेच ते मिग-२१ बायसनचे पायलट आहेत. अभिनंदन यांना हाय शॉट एंगेजमेंटमध्ये पीएफएफ एफ १६ला मात देण्यासाठी घेतलेल्या शॉटसाठी प्रसिद्ध असल्याचे मानले जाते. विंग कमांडर अभिनंदन यांनी २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या एफ-१६ या लढाऊ विमानावर मात करत ते पालं होतं. हे विमान भारतीय हवाई क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, दुर्दैवाने पाकच्या विमानाशी लढताना अभिनंदन यांचे मिग-२१ दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यांनी पॅराशूटने लॅंडिंग केले तेव्हा त्यांना आपण पाकव्याप्त काश्मिरात असल्याचे समजले. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते. पाकच्या सैन्याने ताब्यात घेतल्यावर त्यांनी जे साहस दाखवले त्यामुळे सर्व भारतीयांना त्यांचा अभिमान वाटू लागला. त्यानंतर १ मार्च २०१९ रोजी अभिनंदन यांची भारत-पाक सीमेवरील वाघा बॉर्डर इथे सुटका करण्यात आली. यासाठी त्यांचा वीर चक्र देऊन सन्मानही करण्यात आला.

अभिनंदन यांच्या या कामगिरीमुळेच त्यांनी भारतीय वायुसेनेचा गौरव केला असून भारतीयांना त्यांचा अभिमान वाटत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...