Building Demolition: इमारत कोसळून भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली दबून एका कामगाराचा मृत्यू, SDRF टीम घटनास्थळी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 03, 2022 | 15:42 IST

Building collapses in Haryana's Gurugram: कामगार इमारत पाडण्याचे काम करत होते, असे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हा अपघात झाला. ही घटना गुरुग्राममधील उद्योग विहार फेज वनची आहे.

थोडं पण कामाचं
  • मिळालेल्या माहितीनुसार, जुनी इमारत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे.
  • ढिगाऱ्याखाली अजूनही एक कामगार अडकल्याची भीती आहे.
  • सध्या दोन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

गुरूग्राम: Building collapses in Haryana: हरियाणातील (Haryana) गुरुग्राममधून (Gurugram )  एक अपघाताची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुनी इमारत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही एक कामगार अडकल्याची भीती आहे. सध्या दोन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

कामगार इमारत पाडण्याचे काम करत होते, असे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हा अपघात झाला. ही घटना गुरुग्राममधील उद्योग विहार फेज वनची आहे, जिथे प्लॉट क्रमांक 257 ची इमारत कोसळली आहे. मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

अधिक वाचा-  तुमच्या सर्व समस्या दूर करेल तुरटी, फक्त करा हे उपाय

डीसी निशांत यादव यांनी सांगितले की, एकूण 4 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यातल्या 2 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. एक मजूर अजूनही आत अडकला असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी