Gyanvapi Map: ज्ञानवापीचा ८६ वर्षांपूर्वीचा नकाशा

Gyanvapi 86 years old map come out, it mentions closed gate and basement : ज्ञानवापीचा ८६ वर्षांपूर्वीचा नकाशा जगासमोर आला आहे. हा नकाशा महसूल विभागाच्या १९३६च्या कागदपत्रांमध्ये आहे. नकाशा १९३६ मध्येच तयार करण्यात आल्याचे नोंदीवरून दिसते.

Gyanvapi 86 years old map come out
Gyanvapi Map: ज्ञानवापीचा ८६ वर्षांपूर्वीचा नकाशा 
थोडं पण कामाचं
  • Gyanvapi Map: ज्ञानवापीचा ८६ वर्षांपूर्वीचा नकाशा
  • नकाशा १९३६ मध्येच तयार करण्यात आल्याचे नोंदीवरून दिसते
  • नकाशात बंद गेट (बंद दरवाजे) आणि तळघर यांचा उल्लेख

Gyanvapi 86 years old map come out, it mentions closed gate and basement : ज्ञानवापीचा ८६ वर्षांपूर्वीचा नकाशा जगासमोर आला आहे. हा नकाशा महसूल विभागाच्या १९३६च्या कागदपत्रांमध्ये आहे. नकाशा १९३६ मध्येच तयार करण्यात आल्याचे नोंदीवरून दिसते. नकाशात बंद गेट (बंद दरवाजे) आणि तळघर यांचा उल्लेख आहे. वास्तूमध्ये कोणकोणत्या ठिकाणी काय आढळले आणि कोणकोणत्या ठिकाणी प्रवेशद्वार आहेत याच्या नोंदी आहेत. हा एक मोठा पुरावा असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करत आहेत. हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष या माहितीचा पुढे कसा वापर करतात हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल अशी चर्चा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाराणसी दिवाणी न्यायालयाने वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित कागपत्रे सोपविली आहेत. ज्ञानवापी प्रकरणात पुढील सुनावणी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या पातळीवर होणार आहे. न्यायालय सर्व्हे रिपोर्ट तसेच इतर माहिती, उपलब्ध साक्षी-पुरावे यांच्या आधारे पुढील सुनावणी घेऊन निर्णय देण्याची किंवा निर्देश देण्याची शक्यता आहे. ताज्या माहितीचा ज्ञानवापी प्रकरणावर काय परिणाम होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. वाराणसी जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेशा यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी