Happy Republic Day in Indian Languages from Israel : आज (गुरुवार 26 जानेवारी 2023) भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. इस्रायलच्या दुतावासाच्या शुभेच्छा संदेशामुळे हा दिवस आणखी अविस्मरणीय झाला.
इस्रायल या स्वतंत्र देशाची निर्मिती होण्याआधी ज्यु नागरिक वेगवेगळ्या देशांमध्ये राहात होते. शेकडो ज्यु नागरिक भारतात वास्तव्यास होते. याच कारणामुळे इस्रायल हा देश अस्तित्वात आला तरी ज्यु नागरिक आणि भारतीय यांच्यातील ऋणानुबंध आजही कायम आहेत. याच ऋणानुबंधातून इस्रायलच्या दुतावासाने भारतीय भाषांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा एक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ इस्रायलच्या दुतावासाने आज प्रजासत्ताक दिनी सकाळीच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला.
इस्रायलच्या दुतावासातील निवडक अधिकाऱ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्या भागातील भारतीय भाषेतून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना अधिकाऱ्यांचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले. हे व्हिडीओ फूटेज संकलित करून एक व्हिडीओ तयार करण्यात आला. हा व्हिडीओ प्रजासत्ताक दिनी सकाळीच इस्रायलच्या दुतावासाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला.
इस्रायलच्या दुतावासाचा भारतीय भाषांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक भारतीयांकडून हा व्हिडीओ लाईक, रीट्वीट, शेअर करण्यात आला आहे. इस्रायलच्या दुतावासाच्या या अभिनव प्रयोगाचे भारतीयांनी मनापासून कौतुक आणि स्वागत केले.