VIDEO: काँग्रेस नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १० गोळ्या

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 27, 2019 | 11:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Congress leader shot dead: हरियाणातील फरिदाबाद येथे काँग्रेस नेते विकास चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी विकास चौधरी यांच्यावर तब्बल १० गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.

Congress Leader shot dead
काँग्रेस नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: दिल्लीला लागूनच असलेल्या फरिदाबाद येथे गुरुवारी सकाळी काँग्रेस नेता आणि प्रवक्ता विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर तात्काळ विकास चौधरी यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विकास चौधरी हे आपल्या कारने जिमला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेनंतर काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हरियाणात गुंडाराज आणि गुन्हेगारी वाढली असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटलं की, 'फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ता आणि नेता विकास चौधरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, ही खूपच दु:खद घटना आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडगिरी वाढत आहे. या सर्व प्रकरणात खट्टर सरकार दोषी आहे. या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आरोपीं विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.'


तर हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक तंवर यांनी विकास चौधरी यांच्या हत्ये प्रकरणी हरियाणा सरकारला घेरलं आहे. 'हे जंगल राज आहे, कायद्याचं भय कुणालाही नाहीये. काल सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली होती जेथे छेडछाडीला विरोध करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या घटनेची चौकशी करण्यात यावी'.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: काँग्रेस नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १० गोळ्या Description: Congress leader shot dead: हरियाणातील फरिदाबाद येथे काँग्रेस नेते विकास चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी विकास चौधरी यांच्यावर तब्बल १० गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles