Hindu Sena in Gurugram: नवरात्रीत मटणाची दुकान बंद ठेवण्याची हिंदू सेनेची धमकी 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 07, 2019 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hindu Sena Threat: हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूग्राममध्ये मटण विक्री मालकांना धमकी दिली आहे. या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Hindu Sena workers At meat shop
Hindu Sena in Gurugram: नवरात्रीत मटणाची दुकान बंद ठेवण्याची हिंदू सेनेची धमकी  |  फोटो सौजन्य: ANI

Hindu Sena  workers ask meat shop owners in shops closed during Navratri: शनिवारपासून चैत्र महिन्यातल्या नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. उत्तर भारतात या नवरात्रौत्सवाला खूप महत्त्व असतं. याच पार्श्वभूमीवर हिंदू सेनेनं मटण विक्री मालकांना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रीत दरम्यान मटणाची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हरियाणाच्या गुरूग्राममध्ये हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी मटण विक्री मालकांना नवरात्र सुरू झाल्यानं दुकानं बंद करण्यासाठी मजबूर केलं आहे. ही पहिलीच वेळ नाही आहे की कायदा आणि व्यवस्थेच्या आड येऊन असे प्रयत्न झाले नसतील. अशा घटना गुरूग्राममध्ये वारंवार घडत असतात. 

व्हिडिओमध्ये बघू शकतो की, कशाप्रकारे हातात तलवार घेऊन काही पुरूष जबरदस्तीनं दुकानं बंद करायला सांगत आहेत. या कार्यकर्त्यांनी दुकानदारांना ९ दिवस नवरात्रौत्सवादरम्यान  दुकानं बंद करण्यासाठी सांगत आहे. गेल्या वर्षी गुरूग्राममध्ये अशीच एक घटना घडली होती. ज्यात लाठाकाठ्यांनी आणि हत्यारांनी लोकांना धमकी देतानाचा व्हिडिओ समोर आला होता. तर काही घटनांमध्ये मटण विक्री मालकांना मारहाण झाल्याची घटना देखील घडली होती. 

या घटनेवर डीसीपी वेस्ट सांगतात की, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात हिंदू सेनेचे कार्यकर्ते दुकानदारांना आपली दुकानं बंद करण्यासाठी सांगत आहेत. मात्र आम्हांला या प्रकरणी कोणत्याही प्रकारची तक्रार मिळालेली नाही. या व्हिडिओ संदर्भात तपासणी सुरू आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नवरात्रौत्सवादरम्यान  २२ हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व मटण विक्रीची दुकानं जबरदस्तीनं बंद करण्याची धमकी दिली होती. संयुक्त हिंदू संघर्ष समिती (SHSS), गुरूग्रामने सांगितलं होतं की, जिल्हा प्रशासन त्यांच्या विनंतीवर कारवाई करण्यात अयशस्वी झाल्यामुळे दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याआधीही मार्च २०१७ ला चैत्र नवरात्री दरम्यान दिल्ली- गुडगांव एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूस असलेल्या  जवळपास ३०० मटण विक्रीची दुकानं कार्यकर्त्यांची जबरदस्तीनं बंद केली होती. त्यानंतर सिटी पोलिसांच्या आश्वासनानंतर ती पुन्हा खोलण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी