VIDEO : तरुणीशी छेडछाडनंतर धारदार वस्तूने केला हल्ला...

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 27, 2019 | 13:03 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका तरूणीशी छेडछाडीनंतर धारदार वस्तूने हल्ला केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Woman molested, attacked with sharp object in Faridabad
फरिदाबादमध्ये तरूणीवर हल्ला  |  फोटो सौजन्य: Times Now

फरिदाबाद :  हरियाणाच्या फरिदाबादमध्ये महिलेवर हल्ला केल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. महिलेशी सर्वांसमोर गैरवर्तणूक करण्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. त्या तरूणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोराने धारधार वस्तूने तिच्यावर हल्ला करून तिला जखमी केले. हल्ला झाल्यानंतर तरूणी जमिनीवर कोसळली, त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु घटना स्थळावरून पळून जाण्यात त्या हल्लेखोराला यश आले. 


VIDEO: काँग्रेस नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

दिल्लीला लागूनच असलेल्या फरिदाबाद येथे गुरुवारी सकाळी काँग्रेस नेता आणि प्रवक्ता विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर तात्काळ विकास चौधरी यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विकास चौधरी हे आपल्या कारने जिमला जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेनंतर काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी हरियाणा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हरियाणात गुंडाराज आणि गुन्हेगारी वाढली असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. सुरजेवाला यांनी ट्विट करत म्हटलं की, 'फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ता आणि नेता विकास चौधरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, ही खूपच दु:खद घटना आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडगिरी वाढत आहे. या सर्व प्रकरणात खट्टर सरकार दोषी आहे. या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि आरोपीं विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.'


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO : तरुणीशी छेडछाडनंतर धारदार वस्तूने केला हल्ला... Description: हरियाणाच्या फरिदाबाद येथे एका तरूणीशी छेडछाडीनंतर धारदार वस्तूने हल्ला केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 
Loading...
Loading...
Loading...