...तो माझे तुकडे-तुकडे करेन, मृत्यूपूर्वी श्रध्दाने पोलिसांना लिहिलेलं पत्र

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 23, 2022 | 14:35 IST

shraddha walker murder : श्रद्धा हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. श्रद्धाने वसई पोलिसांना पत्र लिहून आफताबची तक्रार केली होती की तो तिला मारहाण करायचा आणि तिला जीवे मारण्याची आणि तिचे तुकडे करण्याची धमकी देतो.

थोडं पण कामाचं
  • दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने पोलिसांकडे तक्रार केली होती
  • आफताबवर गंभीर आरोप करण्यात आले होते
  • जीवे मारण्याची आणि तुकडे करण्याची धमकी देतोय

मुंबई : श्रद्धा वालकर मर्डर केसमध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबच्या अत्याचारांचा पाढा वाचला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी मुंबईतील वसई पोलिसांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये तिने लिव्ह इन पार्टनर आफताब आपल्याला मारहाण करायचा, असे पोलिसांना सांगितले होते. (...He will tear me to pieces Shraddha's letter to the police two years before her death)

अधिक वाचा : कोश्यारींनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजेंचं थेट राष्ट्रपती अन् पंतप्रधानांना पत्र, वाचा काय म्हटलंय पत्रात...

पोलिस तक्रारीत श्रद्धाने सांगितले होते की, आफताबने तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच याची तक्रार करशील तर तुकडे तुकडे करुन फेकून देईन असे सांगितले आहे. आज हे पत्र समोर आले असताना त्याच्या हत्येला सहा महिने उलटले आहेत. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आफताबने खरोखरच श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले आहेत, त्याचा शोध सुरू आहे. अद्यापपर्यंत मृतदेहाच्या डोक्याचा भाग सापडलेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी