[VIDEO]: पावसाचं थैमान! वाहत्या नदीमध्ये ट्रक अडकला, वाहून जाणाऱ्या ट्रकमधून २० विद्यार्थ्यांची सुटका

Students rescued from flood: ओसंडून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात वाहून जाणारा ट्रक अडकला. या ट्रकमध्ये २० विद्यार्थी प्रवास करत होते. या सर्व विद्यार्थ्यांची ग्रामस्थांनी सुटका केली आहे. घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

heavy rain video 20 school children rescue truck stuck flooded road dungarpur rajasthan news
[VIDEO]: पावसाचं थैमान! वाहत्या नदीमध्ये ट्रक अडकला, वाहून जाणाऱ्या ट्रकमधून २० विद्यार्थ्यांची सुटका 

थोडं पण कामाचं

  • पुराच्या पाण्यात वाहून जाणारा ट्रक अडकला
  • ट्रकमध्ये २० विद्यार्थी करत होते प्रवास
  • सर्व विद्यार्थ्यांची ग्रामस्थांनी केली सुटका
  • घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर

जयपूर: मुसळधार पावसाने देशातील विविध राज्यांत अक्षरश: थैमान घातलं आहे. या अतिवष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजस्थानमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान राजस्थानमधील डुंगरपूर येथे शालेय विद्यार्थी घेऊन जाणारा एक ट्रक नदीच्या पाण्यात वाहून जात असताना अडकला. सुदैवाने हा ट्रक नदीत कोसळला नाही आणि त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या ट्रकमधील विद्यार्थ्यांची सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास २० विद्यार्थ्यांनी भरलेला हा ट्रक डुंगरपूर येथील रामपूर हा पूल ओलांडत असताना ट्रक वाहत्या पाण्यात अडकला. नदी ओसंडून वाहत होती आणि पाण्याच्या प्रवाहात हा ट्रक वाहून जाता-जाता अडकला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत सर्व विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून या ट्रकमधील सर्व विद्यार्थीनी या शाळेतून आपल्या घराच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला आहे. पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यात ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी वाहून जाऊ लागली. सुदैवाने ट्रक नदीच्या पात्रात अर्धा अडकला. ट्रक चालकाची पुढील बाजू नदीत होती तर मागील बाजू पुलावर होती. 

यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मानवी साखळी बनवत ट्रकपर्यंत पोहोचले आणि ट्रकमधील सर्व विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका केली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

तर तिकडे बिहारमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरु आहे आणि या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील पूरग्रस्त भागात एनडीआरएफच्या विविध तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर पावसामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी