पायी जात गृहमंत्री अमित शहांनी घेतलं माता वैष्णोदेवीचं दर्शन, केली जम्मू-काश्मीरच्या समृद्धीसाठी प्रार्थना

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 04, 2022 | 15:28 IST

सोमवारी जम्मू-काश्मीरच्या ( Jammu and Kashmir ) तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित शहा यांनी शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी माँ वैष्णोच्या दरबारात उपस्थित राहून जम्मू-काश्मीरच्या चांगल्या स्थितीसाठी प्रार्थना केली. व

जम्मू-काश्मीर : सोमवारी जम्मू-काश्मीरच्या  ( Jammu and Kashmir ) तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री (Home Minister) अमित शहा  (Amit Shah) यांनी शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी माँ वैष्णोच्या दरबारात उपस्थित राहून जम्मू-काश्मीरच्या चांगल्या स्थितीसाठी प्रार्थना केली. विशेष आरतीमध्ये सहभागी होऊन, गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा पूर्ण अंत व्हावा आणि विकासाची पुनस्थापना व्हावी, या इच्छेने देवीच्या चरणी नतमस्तक झाले. (Home Minister Amit Shah visited Mata Vaishno Devi, prayed for  prosperity of Jammu and Kashmir)

अधिक वाचा  : दसरा मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणावर कायद्याचं लक्ष

माता भगवतीचा आशीर्वाद घेतल्यानंतर गृहमंत्री राजौरी येथे पोहोचले आणि त्यांनी एका विशाल जनसभेला संबोधित केले. अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कार्यक्रमादरम्यान इंटरनेट सेवेवरही परिणाम होणार आहे. सोमवारी राजौरीतील त्यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इंटरनेट सेवा बंद केली आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी