Amit Shah at Times Now Summit 2020: सीएए, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा 

Amit Shah at Times Now Summit 2020: गृहमंत्री अमित शहा स्पष्टपणे त्या सर्व मुद्द्यावर आपले म्हणणे मांडले त्यावर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत असतात. 

Amit Shah at Times Now Summit 2020: सीएएस, एनपीआरला घाबरण्याची गरज नाही - अमित शहा 
home minister amit shahs on caa nrc delhi election result at times now summit in marathi   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  Times Now Summit 2020 च्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचा उल्लेख करताना म्हटले की ही गोष्ट खरी आहे की आम्ही चुकलो. पण आम्ही कधीही विचारधारेशी तडजोड केलेली नाही. शाहीन बागबाबत मी म्हटले की विरोध करण्याचा हक्क आहे. पण प्रश्न आहे की विरोध कसा झाला पाहिजे. ज्या पद्धतीने शाहीन बागमध्ये विरोध केला. तसा आम्हांला आमचे म्हणणे मांडण्याचाही अधिकार आहे. 

दिल्ली निवडणुकीच्या पराभवावर त्यांनी म्हटले की विजय आणि पराजयासाठी अनेक कारणं असतात. हे म्हणणे की बटण असे दाबा की करंट शाहीन बाग मध्ये लागेल ही केवळ म्हण आहे. जोपर्यंत काही लोक म्हणतात की जर भाजप सत्तेत आली नाही तर मुली आणि सुनांवर बलात्कार होणार अशा प्रकारचे वक्तव्य भाजपच्या कोणत्याही नेत्याने केलेले नाही. 

 

 

 

समिटमध्ये शहा यांच्या भाषणातील काही खास गोष्टी 

 1. एससी-एसटी समाजाला नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावर अमित शहा यांनी म्हटले की हे खरे आहे की जर या संदर्भात कोणी दोषी असेल तर काँग्रेस आहे. २०१२ मध्ये उत्तराखंडच्या सरकारने निर्णय केला होता. आणि त्या वेळी काँग्रेसची सरकार होती. त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिला. पण काँग्रेसचे नेते अखेर पर्यंत खरं का नाही बोलत आहे. राहुल गांधी यांनी यावर थयथयाट केला. पण आता काँग्रेसचे नेते या मुद्द्यावर मूग गिळून गप्प आहेत. 
 2. एनपीआर, जनगणना प्रमाणे आहे. कोणालाही दस्ताऐवज दाखविण्याची गरज नाही. जर लोकांना दस्ताऐवज दाखवायचे नाही तर त्यांना कोण सांगत आहे दस्ताऐवज दाखवायला. तोंडाने सांगणे हे दस्तऐवज दाखवणे नसते. 
 3. जम्मू-काश्मीरमध्ये राजकीयदृष्ट्या नजरकैदीबाबत बोलताना सांगितले की, त्याबाबत निर्णय स्थानिक प्रशासन करणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही महबूबा मुफ्ती आणि उमर यांच्याबाबत बोलायचे झाले तर त्यांचे बहुतांशी असे ट्विट आहे जे भडकाऊ आहेत. जोपर्यंत नेत्यांचा काश्मीरात जाण्याचा प्रश्न आहे, तर कोणीही जाऊ शकते. पण त्या ठिकाणी जाऊन भडकाविण्याची परवानगी कोणाला दिली जाऊ शकत नाही. 
 4. शरजील इमामवर अमित शहा यांनी म्हटले की तो आसामला देशातून वेगळे करण्याबाबत बोलत होता. पण आम्ही त्याला बंद करू ठेवले आहे. 
 5. पीएफआय वर गृहमंत्री अमित शहा म्हणाले, की अजून त्याबाबत चौकशी सुरू आहे. त्यावर काही बोलणे चुकीचे होईल. चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेतला जाईल. जोपर्यंत पीएफआयची बाब आहे ते पाऊल आम्ही कधीच उचलले नव्हते. 
 6. एनआरसीसंदर्भात सुरूवात काँग्रेसकडून करण्यात आली होती. प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली कमेटीने निर्णय घेतला होता की देशातील सर्व लोकांच्या ओळखीसाठी एक रजिस्टर बनविण्यात यावे. तर आता काँग्रेस केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहे.   एनआरसी लागू करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आलेला नाही. 
 7. जामियातील हिंसाचाराबाबत अमित शहा यांनी म्हटले की दिल्ली पोलीस त्या लोकांच्या मागे विद्यापीठात दाखल झाले. जे बस आणि स्कुटी जाळण्यासाठी जबाबदार होते. या वेळी जेएनयूचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की हा प्रकार वेगळा होता. फीच्या मुद्द्यावर तोडफोड झाली. त्या घटनाक्रमात केवळ आयशी घोषच जखमी झाली नव्हती. 
 8. सीएएवर सरकार कोणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. जर कोणी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर त्यांना तीन दिवसात भेटण्यासाठी मी तयार आहे. पण वास्तवात हे लोक मला भेटू इच्छित नाही. या विषयावर राजकारण सुरू आहे. 
 9. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील धार्मिक अल्पसंख्याक भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना काँग्रेसने वचन दिले होते. पण काँग्रेसने हे वचन कुठे निभावले. काँग्रेसने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या इच्छेचा सन्मान नाही केला. 
 10. सीएए, एनपीआर आणि एनआरसीवर गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की विरोधकांकडे कोणताही तथ्यात्मक आधार नाही. त्यामुळे विरोधाचा कोणतेही कारण नाही. सर्वात मोठी गोष्ट की काँग्रेस ज्या पद्धतीने विरोध करत आहे. तर त्यांनी राजस्थान सरकारच्या विनंतीला देशासमोर ठेवले पाहिजे. यात म्हटले होते की पाकिस्तानातून आलेल्या हिंदू आणि शिख शरणार्थींना भारताची नागरिकता दिली पाहिजे. 
 11. काँग्रेसच्या वेगवेगळ्या सरकारने म्हटले होते की पाकिस्तानातून आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना लॉंग टर्म व्हिसा दिला पाहिजे. आमच्या सरकारने काय केले की त्यात आणखी काही वर्गांना जोडले. त्याशिवाय सीएएमध्ये त्यांच्या उपजिविकेसाठी काही खास व्यवस्था करण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी