Target Killing: कुलगाममधील हिंदू बँक मॅनेजरची हत्या; हल्ल्याचा व्हिडिओ आला समोर, घटनेनंतर अलर्ट मोडवर गृहमंत्रालय

 जम्मू-काश्मिरच्या (Jammu and Kashmir) कुलगाममध्ये (Kulgam) दहशतवाद्यांच्या (terrorists) टार्गेट हल्ला करण्याच सूत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कलाकाराची हत्या झाली आणि त्यानंतर शिक्षिकेची हत्या करण्यात आली आता एका बँक मॅनेजरची हत्या दहशतवाद्यांनी केली आहे. दरम्यान, घाटीमध्ये सुरक्षा दलाकडून (security forces) अभियान सुरू आहे.

Target Killing: Assassination of Hindu Bank Manager in Kulgam
Target Killing: कुलगाममधील हिंदू बँक मॅनेजरची हत्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहशतवादी बँक शाखेत घुसून गोळीबार करत असल्याचं दिसत आहे.
  • या हल्ल्यात मृत पावलेल्या बँक मॅनेजरचं नाव विजय कुमार बेनिवाल आहे.
  • विजय कुमार बेनिवाल हे राजस्थानमधील रहिवाशी होते.

Kulgam Terror Attack: नवी दिल्ली :  जम्मू-काश्मिरच्या (Jammu and Kashmir) कुलगाममध्ये (Kulgam) दहशतवाद्यांच्या (terrorists) टार्गेट हल्ला करण्याच सूत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही कलाकाराची हत्या झाली आणि त्यानंतर शिक्षिकेची हत्या करण्यात आली आता एका बँक मॅनेजरची हत्या दहशतवाद्यांनी केली आहे. दरम्यान, घाटीमध्ये सुरक्षा दलाकडून (security forces) अभियान सुरू आहे, अशात दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दहशतवादी बँक शाखेत घुसून गोळीबार करत पळून गेल्याचे दिसत आहे. टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 

या हल्ल्यात मृत पावलेल्या बँक मॅनेजरचं नाव विजय कुमार बेनिवाल असून ते राजस्थानमधील हनुमानगड शहरातील भगवान गावचे रहिवासी होते. विजय कुमार यांची ही नवीन पोस्टिंग होती. कुलगाम जिल्ह्यातील अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेतील बँक व्यवस्थापक असलेल्या विजय कुमार यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगडचे रहिवासी आहेत. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या परिसराची नाकेबंदी केली असल्याचं जम्मू काश्मिर पोलिसांनी सांगितलं आहे. 

काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्यानं गृहमंत्रालय अलर्ट मोडवर

दरम्यान, काश्मिरात हत्येच्या घटना वाढल्यानं गृहमंत्रालय अलर्ट मोडवर आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हांसोबत बैठक घेणार आहे. अमित शाह हे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेणार असल्याची देखील माहिती आहे. 

नेत्यांकडून निषेध अन् शोक व्यक्त

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कुलगाम येथील बँक व्यवस्थापक विजय कुमार बेनिवाल यांच्या हत्येचा निषेध केला.  मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केले की, आज कुलगाममध्ये कार्यरत असलेल्या विजय कुमार या बँक मॅनेजरच्या लक्ष्यित हत्येचा निषेध करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. 

या घटनेचा निषेध करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे कार्यरत असलेल्या राजस्थानच्या हनुमानगढ येथील रहिवासी विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांच्या आत्म्याला शांती आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. एनडीए सरकार काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने काश्मीरमधील नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी. दहशतवाद्यांकडून आमच्या नागरिकांची अशी हत्या खपवून घेतली जाणार नाही,असेही गहलोत म्हणालेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी